Indian Squad Update for zimbabwe : शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर रवाना झाला आहे, मात्र त्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) संघात मोठे बदल केले असून तीन भारतीय खेळाडूंचा समावेश केला आहे. या तीन खेळाडूंमध्ये साई सुदर्शन, जितेश शर्मा आणि हर्षित राणा आहेत.
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात ५ टी-२० सामन्यांची मालिका सामना होणार आहे. या तिन्ही खेळाडूंना पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघाचा भाग बनवण्यात आले आहे.
शिवम दुबे, यशस्वी जैस्वाल आणि संजू सॅमसन या तीन खेळाडूंना पहिल्या मालिकेत स्थान मिळाले होते. हे तिन्ही खेळाडू २०२४ च्या T20 विश्वचषकाचा भाग होते. पण सध्या विश्वचषक विजेत्या टीम इंडियाला बार्बाडोसहून परतता आलेले नाही, त्यामुळे तिन्ही खेळाडू टीम इंडियासोबत झिम्बाब्वेला रवाना होऊ शकले नाहीत. अशा तिन्ही खेळाडूंऐवजी साई सुदर्शन, जितेश शर्मा आणि हर्षित राणा यांनी संघात स्थान देण्यात आले आहे.
भारताचा युवा संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर गेला आहे. टीम इंडियाला झिम्बाब्वेमध्ये ५ टी-20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. ही मालिका ६ जुलैपासून सुरू होणार आहे. झिम्बाब्वे दौऱ्यावर शुभमन गिल भारतीय कर्णधार असेल.
आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणारा हर्षित राणा पहिल्यांदाच टीम इंडियामध्ये सामील झाला आहे. याआधी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा झाली तेव्हा चाहत्यांनी हर्षितबाबत प्रश्न उपस्थित केले होते. आता हर्षितला संघात स्थान मिळाले आहे.
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पहिला T20 सामना ६ जुलै रोजी होणार आहे. दुसरा T20 सामना ७ जुलै रोजी, तिसरा T20 सामना १० जुलै रोजी, चौथा T20 सामना १३ जुलै रोजी आणि पाचवा आणि अंतिम T20 सामना १४ जुलै रोजी खेळवला जाईल. टी-20 मालिकेतील सर्व सामने हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळवले जातील.
भारत विरुद्ध झिम्बाब्वे T20 मालिका इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये प्रसारित केली जाईल. भारतीय चाहते सोनी स्पोर्ट्स नेटवर्क चॅनेलवर या मालिकेचा आनंद घेऊ शकतात. सामने सोनी टेन 3 (हिंदी) आणि सोनी टेन 4 (तमिळ/तेलुगु) वर टीव्हीवर थेट प्रक्षेपित केले जातील.
भारत-झिम्बाब्वे T20 मालिकेतील सामन्यांचे लाइव्ह स्ट्रिमिंग 'सोनी लिव्ह' ॲपवर उपलब्ध असेल, पण यासाठी तुम्हाला सब्स्क्रिप्शन घ्यावे लागेल.
झिम्बाब्वे दौऱ्यातील पहिल्या दोन सामन्यांसाठी टीम इंडिया - शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), हर्शित राणा, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अविनाश. खान, खलील अहमद, मुकेश कुमार आणि तुषार देशपांडे.
संबंधित बातम्या