Sachin Tendulkar : सचिनचा अपर कट बघितला का? चाहत्यांना थेट शोएब अख्तरच आठवला, एकदा पाहाच!
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Sachin Tendulkar : सचिनचा अपर कट बघितला का? चाहत्यांना थेट शोएब अख्तरच आठवला, एकदा पाहाच!

Sachin Tendulkar : सचिनचा अपर कट बघितला का? चाहत्यांना थेट शोएब अख्तरच आठवला, एकदा पाहाच!

Published Mar 17, 2025 01:21 PM IST

Sachin Tendulkar Upper Cut Video : इंडिया मास्टर्सचा कर्णधार सचिन तेंडुलकर याने १८ चेंडूत २५ धावा केल्या. या खेळीत सचिनने एक शानदार अपर कटचा फटका मारला. हा शॉट पाहून चाहत्यांची २२ वर्षांपूर्वीची एक आठवण ताजी झाली.

Sachin Tendulkar : सचिनचा अपर कट बघितला का? चाहत्यांना थेट शोएब अख्तरच आठवला, एकदा पाहाच!
Sachin Tendulkar : सचिनचा अपर कट बघितला का? चाहत्यांना थेट शोएब अख्तरच आठवला, एकदा पाहाच! (Twitter)

Sachin Tendulkar Upper Cut Video : इंटरनॅशनल मास्टर्स लीगचा पहिला सीझन इंडिया मास्टर्स संघाने जिंकला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या नेतृत्वाखालील इंडिया मास्टर्स संघाने अंतिम फेरीत वेस्ट इंडिजचा ६ विकेट राखून पराभव केला. वेस्ट इंडिज मास्टर्स संघाचे नेतृत्व महान फलंदाज ब्रायन लारा याने केले.

इंडिया मास्टर्सचा कर्णधार सचिन तेंडुलकर याने १८ चेंडूत २५ धावा केल्या. या खेळीत सचिनने एक शानदार अपर कटचा फटका मारला. हा शॉट पाहून चाहत्यांची २२ वर्षांपूर्वीची एक आठवण ताजी झाली.

वास्तविक, सचिन तेंडुलकर याने २००३ च्या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानच्या शोएब अख्तर याला असाच अपर कट लगावला होता. तो चेंडू थेट प्रेक्षकांमध्ये जाऊन पडला होता. आता सचिनने २२ वर्षांनी पुन्हा एकदा अगदी तसाच फटका मारला. यावेळी गोलंदाज वेस्ट इंडिजचा जेरोम टेलर होता. 

जेरोम टेलरच्या चेंडूवर सचिनचा उत्कृष्ट अप्पर कट

वेगवान गोलंदाज जेरोम टेलर वेस्ट इंडिज मास्टर्ससाठी पॉवरप्लेचे शेवटचे षटक टाकण्यासाठी आला होता. या षटकात सचिन तेंडुलकरने आधी चौकार मारला. यानंतर त्याने उत्कृष्ट शैलीत अप्पर कट लगावून षटकार वसूल केला. सचिन तेंडुलकरचा अप्पर कट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

इंडिया मास्टर्सने पटकावले जेतेपद

दरम्यान, इंटरनॅशन मास्टर्स लीग स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या वेस्ट इंडिज मास्टर्स संघाने २० षटकांत ७ गडी गमावून १४८ धावा केल्या. वेस्ट इंडिज मास्टर्ससाठी सलामीवीर ड्वेन स्मिथने ३५ चेंडूत ४५ धावा केल्या. तर लिंडन सिमन्सने ४१ चेंडूत ५७ धावांचे योगदान दिले.

वेस्ट इंडिज मास्टर्सच्या १४८ धावांना प्रत्युत्तर देताना इंडिया मास्टर्सने १७.१ षटकांत ४ गडी राखून लक्ष्य गाठले. इंडिया मास्टर्ससाठी अंबाती रायडूने ५० चेंडूत सर्वाधिक ७४ धावा केल्या. तर इंडिया मास्टर्सचा कर्णधार सचिन तेंडुलकरने १८ चेंडूत २५ धावा केल्या.

Rohit Bibhishan Jetnavare

eMail

Whats_app_banner

संबंधित बातम्या