मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  मुरलीधरनच्या चेंडूवर सचिन पहिल्याच चेंडूवर बाद, कैफने पकडला अप्रतिम झेल, पाहा

मुरलीधरनच्या चेंडूवर सचिन पहिल्याच चेंडूवर बाद, कैफने पकडला अप्रतिम झेल, पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 18, 2024 08:03 PM IST

One wWorld vs One Family T20 : या चॅरिटी सामन्याचे आयोजन 'श्री मधुसूदन साई ग्लोबल परोपकारी सेवा अभियान' यांच्या तर्फे करण्यात आले होते. यावेळी वन वर्ल्ड आणि वन फॅमिली हे दोन संघ आमनेसामने होते.

One wWorld vs One Family T20
One wWorld vs One Family T20 (Live Hindustan)

Sachin Tendulkar vs Muttiah Muralitharan : जगातील सर्वात महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि सर्वात महान फिरकी गोलंदाज मुथैय्या मुरलीधरन हे निवृत्त होऊन अनेक वर्षे लोटली आहेत. पण हे दोन्ही दिग्गज आज गुरुवारी (१८ जानेवारी) एका चॅरिटी सामन्यात एकमेकांविरुद्ध खेळताना दिसले.

विशेष म्हणजे, या सामन्यात मुरलीधरनने सचिनला पहिल्याच चेंडूवर बाद केले. सचिन तेंडुलकरने १६ चेंडूत २७ धावांची खेळी खेळली. सचिनला मुरलीधरनने त्याच्या पहिल्याच चेंडूवर झेलबाद केले. तेंडुलकरने मुरलीधरनच्या पहिल्याच चेंडूवर पुढे येऊन हवेत फटका खेळण्याचा प्रयत्न केला पण फटका बरोबर बसला नाही आणि मोहम्मद कैफने लाँग ऑनवर अप्रतिम झेल घेतला.

दरम्यान, या चॅरिटी सामन्याचे आयोजन 'श्री मधुसूदन साई ग्लोबल परोपकारी सेवा अभियान' यांच्या तर्फे करण्यात आले होते. यावेळी वन वर्ल्ड आणि वन फॅमिली हे दोन संघ आमनेसामने होते.

सचिन वन वर्ल्डचा कर्णधार होता. तर युवराज सिंगने वन फॅमिली या संघाचे नेतृत्व केले. हा चॅरिटी सामना कर्नाटकातील मुद्देनहल्ली येथील साई कृष्णन क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला.

सचिनच्या वन वर्ल्डने युवीच्या वन फॅमिलाल हरवलं

सामन्यात सचिन लवकर बाद झाला. पण सचिनच्या संघाने युवराजच्या वन फॅमिलीचा ४ विकेट्सनी पराभव केला. या सामन्यात ७ देशांचे २४ दिग्गज खेळाडू सहभागी झाले होते.

सामन्यात युवराज सिंगच्या वन फॅमिली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. त्यांनी २० षटकात १८१ धावा केल्या. प्रत्युत्तरात सचिन आणि नमन ओझा यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. सचिनने २७ धावांच्या खेळीत ३ चौकार मारले.

शेवटी संघाला १२ चेंडूत १७ धावांची गरज असताना इरफान पठाणने आपल्या संघाला विजयाच्या जवळ नेले. शेवटच्या षटकात केवळ ७ धावांची गरज असताना इरफानने मोठा भाऊ युसूफ पठाणच्या चेंडूवर षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला.

सचिनच्या वन वर्ल्डकडून आफ्रिकेच्या अल्विरो पीटरसनच्या ५० चेंडूत ७४ धावांची खेळी केली आणि संघाला विजय मिळवला.

WhatsApp channel
For latest Cricket News Live Score stay connected with HT Marathi