Sachin Tendulkar Video : सचिनने सुरू केला फलंदाजीचा सराव, या लीगमध्ये खेळणार, कॅलिस-संघकाराही दिसणार
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Sachin Tendulkar Video : सचिनने सुरू केला फलंदाजीचा सराव, या लीगमध्ये खेळणार, कॅलिस-संघकाराही दिसणार

Sachin Tendulkar Video : सचिनने सुरू केला फलंदाजीचा सराव, या लीगमध्ये खेळणार, कॅलिस-संघकाराही दिसणार

Published Feb 04, 2025 09:14 PM IST

Sachin Tendulkar IML 2025 : सचिन तेंडुलकर आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग (IML) स्पर्धेसाठी नेटमध्ये घाम गाळत आहे. २२ फेब्रुवारीपासून ही स्पर्धा सुरू होत आहे. त्याच वेळी, मास्टर्स क्रिकेट लीग स्पर्धेचा अंतिम सामना १६ मार्च रोजी खेळवला जाईल.

Sachin Tendulkar Video : सचिनने सुरू केला फलंदाजीचा सराव, या लीगमध्ये खेळणार, कॅलिस-संघकाराही दिसणार
Sachin Tendulkar Video : सचिनने सुरू केला फलंदाजीचा सराव, या लीगमध्ये खेळणार, कॅलिस-संघकाराही दिसणार

Sachin Tendulkar Viral Video : आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्सने भारताचा माजी दिग्गज सचिन तेंडुलकर याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा नेटमध्ये फलंदाजीचा सराव करताना दिसत आहे.

वास्तविक, सचिन तेंडुलकर आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग (IML) स्पर्धेसाठी नेटमध्ये घाम गाळत आहे. २२ फेब्रुवारीपासून ही स्पर्धा सुरू होत आहे. त्याच वेळी, मास्टर्स क्रिकेट लीग स्पर्धेचा अंतिम सामना १६ मार्च रोजी खेळवला जाईल.

सचिन तेंडुलकर याच्यासोबतच इतर अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी या स्पर्धेसाठी तयारी सुरू केली आहे.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

सचिन तेंडुलकरचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोबतच सोशल मीडिया यूजर्स कमेंट करून आपला फीडबॅक देत आहेत. आपल्या आवडत्या क्रिकेटपटूला फलंदाजी करताना पाहून क्रिकेट चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे.

सचिन, लारा, कुमार संगकारा ते कॅलिस खेळणार

भारतासह श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज हे संघ IML स्पर्धेत खेळणार आहेत.

ब्रायन लारा वेस्ट इंडिजचे कर्णधार असेल. तर माजी अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज कुमार संगकारा श्रीलंकेचे नेतृत्व करताना दिसणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाची कमान जॅक कॅलिस याच्या हाती असेल. इयॉन मॉर्गन इंग्लंडचे नेतृत्व करताना दिसणार आहे. तर ऑस्ट्रेलियाचा कर्णेधार अष्टपैलू शेन वॉटसन असेल.

आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग स्पर्धा २२ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. त्याच वेळी, IML चा अंतिम सामना १६ मार्च रोजी खेळवला जाईल. त्याचबरोबर सुनील गावसकर यांना आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग स्पर्धेचे ब्रँड ॲम्बेसेडर बनवण्यात आले आहे.

Rohit Bibhishan Jetnavare

eMail

Whats_app_banner

संबंधित बातम्या