Viral Video : अनवाणी गोलंदाजी करणाऱ्या चिमुकलीला पाहून सचिन भारावला, थेट झहीर खानला टॅग केला व्हिडीओ
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Viral Video : अनवाणी गोलंदाजी करणाऱ्या चिमुकलीला पाहून सचिन भारावला, थेट झहीर खानला टॅग केला व्हिडीओ

Viral Video : अनवाणी गोलंदाजी करणाऱ्या चिमुकलीला पाहून सचिन भारावला, थेट झहीर खानला टॅग केला व्हिडीओ

Dec 21, 2024 11:20 AM IST

Sachin Tendulkar Sushila Meena : राजस्थानची युवा डावखुरी वेगवान गोलंदाज सुशीला मीना सध्या इंटरनेट सेन्सेशन बनली आहे. सचिनही तिचा व्हिडिओ शेअर करण्यापासून स्वत:ला रोखू शकला नाही. अनवाणी गोलंदाजी करणाऱ्या सुशीलाची अ‍ॅक्शन झहीर खानची आठवण करून देते.

Viral Video : अनवाणी गोलंदाजी करणाऱ्या चिमुकलीला पाहून सचिन भारावला, थेट झहीर खानला टॅग केला व्हिडीओ
Viral Video : अनवाणी गोलंदाजी करणाऱ्या चिमुकलीला पाहून सचिन भारावला, थेट झहीर खानला टॅग केला व्हिडीओ (Twitter/Getty)

महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने एका चिमुकलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या चिमुकलीचे नाव सुशीला मीना असून ती राजस्थानातील एका खेडेगावात राहणारी आहे. सचिनने शेअर केलेल्या व्हिडीओत सुशीला मीना वेगवान गोलंदाजी करताना दिसत आहे.

सचिनने व्हिडीओ पोस्ट करताचा तो वाऱ्यासारखा पसरला आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ सचिनने माजी गोलंदाज झहीर खान यालाही टॅग केला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये सुशीला शाळेचा गणवेश घालून अनवाणी बॉलिंगचा सराव करताना दिसत आहे, ज्यात तिची पॅशन दिसून येत आहे.

सचिन तेंडुलकरने व्हायरल व्हिडिओ ट्विट करून लिहिले की, ही सहज आणि सरळ गोलंदाजी पाहून मला झहीर खानची आठवण झाली. चेंडू रीलीज करण्यापूर्वी सुशीला मीना ज्या शैलीत उडी घेत आहे ती महान वेगवान गोलंदाज झहीर खानशी मिळतेजुळते आहे. सचिनने आपल्या पोस्टमध्ये झहीर खानला टॅग केले आहे.

झहीरने रिप्लाय केला

भारताच्या सर्वकालीन महान वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या झहीर खानने या पोस्टला उत्तर दिले आणि लिहिले, 'तुम्ही अगदी बरोबर आहात. या मुलीची गोलंदाजी अ‍ॅक्शन अतिशय प्रभावी आहे. ती आधीच खूप प्रतिभावान दिसत आहे.

हा व्हिडिओ मूळतः ईश्वर अमालिया नावाच्या युजरने इंस्टाग्रामवर पोस्ट केला होता, जो सुशीलाचा प्रशिक्षक असू शकतो. पण आता हा व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला आहे.

इयत्ता पाचवीत शिकणारी ही मुलगी शाळेच्या ड्रेसमध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी करत आहे, यातून हे दिसते की, ग्रामीण भारतात टॅलेंटची कमतरता नाही.

भारताच्या वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या झहीर खानने २००० साली पदार्पण केले. कारकिर्दीत भारताच्या वेगवान गोलंदाजी आक्रमणाचा कणा बनला.

झहीरच्या नावावर ३११ कसोटी विकेट्स आणि २८२ एकदिवसीय विकेट्स आहेत. सचिन तेंडुलकरने सुशीलाचा व्हिडिओ शेअर करणे हे ग्रामीण भारतातील प्रतिभेला प्रोत्साहन देणारे आहे. सुशीलासारख्या असंख्य मुली ग्रामीण भागात आहेत ज्यांना योग्य प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळाल्यास ते जागतिक स्तरावर चमकू शकतात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या