टी-20 वर्ल्डकप २०२४ मध्ये रविवारी (८ जून) भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला. या सामन्यात भारताने पाकिस्तान ६ धावांनी धुव्वा उडवला. यानंतर पाकिस्तानी फॅन्स चांगलेच संतापले आहेत. कारण पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे.
टी-20 वर्ल्डकप २०२४ मध्ये पाकिस्तानने अतिशय खराब कामगिरी केली आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानला अमेरिकेकडून पराभव स्वीकारावा लागला होता. यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६ धावांनी पराभव केला. या खराब कामगिरीनंतर पाकिस्तान संघाला सर्व बाजूंनी टीकेचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, भारत-पाकिस्तान सामना अतिशय भावनिक असतो. अशातच पाकिस्तानमध्ये या सामन्यापूर्वी जे घडले ते खूपच धक्कादायक आहे. वास्तविक, एका सुरक्षा रक्षकाने भारत-पाकिस्तान सामन्याबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्या यूट्यूबरवर गोळी झाडली.
या घटनेत YouTuber त्याचा जीव वाचवू शकला नाही. यूट्यूबरला काही लोकांनी हॉस्पिटलमध्ये नेले पण त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे सर्वांना धक्का बसला आहे.
पाकिस्तानी मीडियानुसार, यूट्यूबर साद अहमद कराचीतील मोबाईल मार्केटमध्ये भारत-पाकिस्तान सामन्याबाबत लोकांची मते जाणून घेत होता. यावेळी त्याने एका दुकानाबाहेर उभ्या असलेल्या गार्डला सामन्याबाबत प्रश्न विचारला. प्रश्न ऐकताच गार्ड संतापला. सादचे प्रश्न विचारणे त्याला आवडले नाही आणि तो कॅमेऱ्यात कैद व्हावा अशी त्याची इच्छा नव्हती. यावरून दोघांमध्ये हाणामारी झाली आणि गार्डने सादवर गोळी झाडली.
सादला रुग्णालयात नेले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. जिओ न्यूजने आपल्या वृत्तात म्हटले आहे की, साद हा त्याच्या कुटुंबातील एकमेव कमावता व्यक्ती होता.
मात्र, भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात पाकिस्तानी संघ विजयाच्या उंबरठ्यावर येऊन पराभूत झाला. भारताने त्यांच्या तोंडून विजय हिसकावून घेतला. टी-२० विश्वचषकात भारताचा पाकिस्तानवरचा हा सातवा विजय आहे. या विश्वचषकात पाकिस्तानचा हा दुसरा पराभव आहे. यापूर्वी अमेरिकेसारख्या संघाविरुद्ध पाकिस्तानचा पराभव झाला होता.
संबंधित बातम्या