SA20 League Live Streaming : दक्षिण आफ्रिकेत आजपासून (१० जानेवारी) दक्षिण आफ्रिका टी-20 लीगचा (SA T20 2024) दुसरा सीझन खेळवला जाणार आहे. या लीगमध्ये दक्षिण आफ्रिकेचे जवळपास सर्वच स्टार खेळाडू खेळणार आहे. तसेच, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे काही खेळाडूही ही लीग खेळताना दिसणार आहेत.
साऊथ आफ्रिका टी-20 लीग महिनाभर चालेल. या स्पर्धेचा पहिला सामना सनरायझर्स इस्टर्न कॅप आणि जॉबर्ग सुपर किंग्स यांच्यात खेळला जाणार आहे. तर स्पर्धेचा अंतिम सामना १० फेब्रुवारी रोजी खेळला जाईल.
SA20 2024 मध्ये लीग फेरीत एकूण ३० सामने खेळवले जातील. यानंतर, आयपीएलसारखे ३ प्लेऑफ सामने होतील आणि शेवटी अंतिम सामना असेल.
१० जानेवारी ते ८ फेब्रुवारीपर्यंत दररोज सामने खेळले जातील. फक्त दर शनिवारी २ सामने खेळले जातील तर उर्वरित दिवशी प्रत्येकी एक सामना होईल. अशा प्रकारे लीगमध्ये एकूण ३४ सामने खेळवले जातील.
दक्षिण आफ्रिका टी-20 लीगचे सामने भारतीय वेळेनुसार रात्री ९ वाजता सुरू होतील. ज्या दिवशी दोन सामने असतील, त्या दिवशी पहिला सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी ५ वाजता सुरू होईल.
तर दक्षिण आफ्रिकेची ही T 20 लीगचे सामने टीव्हीवर स्पोर्ट्स-18 या चॅनलवर लाईव्ह दिसतील. तर SA20 2024 चे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमावर पाहता येईल.
दक्षिण आफ्रिकेच्या या टी-20 लीगमध्ये ६ संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेच्या पहिल्या मोसमात एडन मार्करामच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स इस्टर्न कॅपने विजेतेपद पटकावले होते.
दक्षिण आफ्रिका टी-20 लीगमध्ये सनरायझर्स इस्टर्न कॅप, डर्बन सुपर जायंट्स, जॉबर्ग सुपर किंग्स, एमआय केप टाउन, पार्ल रॉयल्स आणि प्रिटोरिया कॅपिटल्स हे संघ एकमेकांना भिडणार आहे.
तर एडन मार्कराम, फाफ डुप्लेसिस, केशव महाराज, किरॉन पोलार्ड, वेन पारनेल आणि डेव्हिड मिलर हे कर्णधारांच्या भूमिकेत दिसतील.