South Africa T20 Leage: दक्षिण आफ्रिकेतील टी-२० लीगमधील ७व्या सामन्यात डर्बन सुपर जायंट्स आणि जॉबर्ग सुपर किंग्स एकमेकांशी भिडले. या सामन्यात डर्बन सुपर जायंट्सने जॉबर्ग सुपर किंग्सचा ३७ धावांनी पराभव केला. मात्र, डर्बन सुपर जायंट्सच्या विजयापेक्षा जॉबर्ग सुपर किंग्सचा खेळाडू रोमारियो शेफर्डने फिल्डिंगची जोरदार चर्चा रंगली आहे. या सामन्यात रोमारियो शेफर्डने असा झेल घेतला की, तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. शेफर्डच्या झेलचा व्हिडिओ दक्षिण आफ्रिका टी-२० लीगच्या अधिकृत सोशल मीडियाद्वारे शेअर करण्यात आले. रोमॅरियोचा हा झेल पाहून मैदानातील सगळेच आश्चर्यचकीत झाले.
व्हायरल व्हिडिओत शेफर्ड लेग साइडला फिल्डिंगसाठी उभा आहे. त्याचवेळी डर्बन सुपर जायंट्सच्या फलंदाजांनी मारलेला चेंडू त्याच्या दिशेने येतो. हा चेंडू मैदानापासून ८-१० फूट उंचीवर होता. मात्र, तरीही शेफर्डने उंच हवेत उडी घेत अविश्वसनीय झेल पकडला. शेफर्डचा हा झेल पाहून मैदानातील सगळेच आश्चर्यचकीत झाले. शेफर्डने डरबन सुपर जायंट्सच्या मॅथ्यू ब्रित्झकेचा झेल घेतला. हा झेल पहिल्या डावाच्या चौथ्या षटकातील पाचव्या चेंडूवर घेतला आहे.
या सामन्यात नाणेफेक जिंकून डर्बन सुपर जायंट्सने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. डर्बन सुपर जायंट्सने २० षटकात ८ विकेट गमावून १४५ धावा केल्या. डर्बनकडून हेनरिक क्लासेनने सर्वाधिक ६४ धावांची खेळी केली. तर, सुपर किंग्जकडून लिझाद विल्यम्सने सर्वाधिक चार विकेट घेतल्या.
या लक्ष्याचा पाठलाग करताना सुपर किंग्जची फलंदाजी पत्त्यासारखी ढासळली. रीझा हेंड्रिक्स आणि मोईन अली व्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. सुपर किंग्जने हा सामना ३७ धावांनी गमावला. डर्बनकडून रीस टोप्लेने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. या सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या डर्बनच्या हेनरिक क्लासेनने सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
संबंधित बातम्या