SA vs NEP Highlights : चित्तथरारक सामन्यात नेपाळचा एका धावेने पराभव, शेवटच्या चेंडूवर फलंदाज धावबाद
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  SA vs NEP Highlights : चित्तथरारक सामन्यात नेपाळचा एका धावेने पराभव, शेवटच्या चेंडूवर फलंदाज धावबाद

SA vs NEP Highlights : चित्तथरारक सामन्यात नेपाळचा एका धावेने पराभव, शेवटच्या चेंडूवर फलंदाज धावबाद

Published Jun 15, 2024 11:18 AM IST

टी-20 विश्वचषक २०२४ च्या ३१व्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नेपाळचा अवघ्या एका धावेने पराभव केला. आफ्रिकेने टी-20 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पाचव्यांदा ही कामगिरी केली.

Nepal lost to South Africa by just one run
Nepal lost to South Africa by just one run

टी-20 विश्वचषक २०२४ च्या ३१ व्या सामन्यात नेपाळचा एका धावेने पराभव झाला. शनिवारी (१५ जून) सेंट व्हिन्सेंट येथील अर्नोस व्हॅले मैदानावर झालेल्या सामन्यात आफ्रिकेने नेपाळचा एका धावेने पराभव केला.

हा सामना खूपच रोमांचक झाला आणि शेवटच्या चेंडूवर आफ्रिकेने विजय मिळवला. विशेष म्हणजे, आफ्रिकेने केवळ एका धावेच्या फरकाने सामना जिंकण्याची टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात ही पहिलीच वेळ नाही, तर आफ्रिकेने ही कामगिरी करण्याची पाचवी वेळ होती. आफ्रिका हा असा संघ आहे ज्याने आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिक वेळा एका धावाने सामने जिंकले आहेत.

टी-20 विश्वचषक स्पर्धेतच आफ्रिकन संघाने दोनदा १ धावेने विजय मिळवला. याआधी आफ्रिकेने २००९ च्या वर्ल्डकपमध्ये एका धावेने विजय मिळवला होता. आफ्रिकेने लॉर्ड्स येथे न्यूझीलंडचा पराभव एका धावेच्या फरकाने पराभव केला होता. आता २०२४ च्या स्पर्धेत आफ्रिकेने नेपाळचा १ धावेने पराभव केला.

असोसिएट देश नेपाळेने आज एका धावेने सामना गमावला, पण त्यांनी कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

तत्पूर्वी, या सामन्यात नेपाळने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा स्थितीत त्यांनी दक्षिण आफ्रिकेला केवळ ११५ धावांवर रोखले. यानंतर ११६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नेपाळला २० षटकांत ६ गडी गमावून केवळ ११४ धावाच करता आल्या. यंदाच्या विश्वचषकातला हा तिसरा मोठा अपसेट ठरणार होता. यापूर्वी अमेरिकेने पाकिस्तानला तर अफगाणिस्तानने न्यूझीलंडचा पराभव केला आहे.

नेपाळने आफ्रिकेला झुंजवलं

नेपाळने प्रथम गोलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेचे कंबरडे मोडले. धोकादायक फलंदाजी करणारा दक्षिण आफ्रिकेचा संघ नेपाळच्या गोलंदाजांसमोर कोलमडला. त्यांना निर्धारित २० षटकात ७ विकेट्सवर केवळ ११५ धावा करता आल्या. नेपाळकडून कुशल भुरटेलने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. तर दीपेंद्र सिंग ऐरी यालाही ३ विकेट मिळाले. दक्षिण आफ्रिकेकडून रीझा हेंड्रिक्सने सर्वाधिक ४३ धावा केल्या. ट्रिस्टन स्टब्सनेही नाबाद २७ धावांची चांगली खेळी केली.

 

नेपाळचा अवघ्या एका धावेनी पराभव झाला

नेपाळने आपल्या फलंदाजीची सुरुवात अतिशय हुशारीने केली होती. त्यांचे फलंदाज आपला डाव सावधपणे पुढे नेत होते. एकावेळी असे वाटत होते की नेपाळ इतिहास रचेल. ते दक्षिण आफ्रिकेला सहज पराभूत करतील. मात्र त्यानंतर एकामागून एक विकेट पडत गेल्याने नेपाळचा संघ दडपणाखाली आला. नेपाळची तिसरी विकेट ८५ धावांवर पडली. यानंतर १५ धावांत आणखी ३ विकेट पडल्या.

शेवटच्या षटकात ८ धावांची गरज होती

नेपाळला शेवटच्या षटकात विजयासाठी ८ धावांची गरज होती. दक्षिण आफ्रिकेसाठी ओटनील बार्टमन हे षटक टाकत होता. या षटकात पहिल्या ५ चेंडूत स्ट्राइकवर असलेल्या गुलशन झा याने ६ धावा केल्या होत्या. शेवटच्या चेंडूवर ती बीट झाला. चेंडू विकेटकीपरच्या हातात गेला, मात्र असे असतानाही त्यांनी सिंगल घेण्याचा प्रयत्न केला. तो जवळपास क्रीजवर पोहोचला होता. पण वेळेत बॅट खाली आणता आली नाही आणि तो धावबाद झाला. अशा स्थितीत नेपाळने अवघ्या १ धावेने सामना गमावला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या