Ruturaj Gaikwad : ऋतुराज गायकवाडला नेमकं काय झालं? २ चेंडू खेळून मैदान सोडलं, जाणून घ्या-ruturaj gaikwad retired hurt due to injury on second ball in duleep trophy 2024 ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Ruturaj Gaikwad : ऋतुराज गायकवाडला नेमकं काय झालं? २ चेंडू खेळून मैदान सोडलं, जाणून घ्या

Ruturaj Gaikwad : ऋतुराज गायकवाडला नेमकं काय झालं? २ चेंडू खेळून मैदान सोडलं, जाणून घ्या

Sep 12, 2024 02:26 PM IST

Ruturaj Gaikwad : भारत ब ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या वेळी ऋतुराज गायकवाड आणि साई सुदर्शन भारत क संघाकडून सलामीला आले. गायकवाडने २ चेंडूंचा सामना करताना एक चौकार मारला. त्याने ४ धावा केल्या आणि दुखापतीमुळे तो मैदानाबाहेर पडला.

Ruturaj Gaikwad : ऋतुराज गायकवाडला नेमकं काय झालं? २ चेंडूत खेळून मैदान सोडलं, जाणून घ्या
Ruturaj Gaikwad : ऋतुराज गायकवाडला नेमकं काय झालं? २ चेंडूत खेळून मैदान सोडलं, जाणून घ्या

दुलीप ट्रॉफी २०२४ च्या दुसऱ्या फेरीला आज (१२ सप्टेंबर) सुरुवात झाली. या स्पर्धेतील इंडिया बी आणि इंडिया सी यांच्यातील सामन्यादरम्यान ऋतुराज गायकवाड जखमी झाला. सामन्याच्या मध्यावर तो मैदान सोडून गेला.

अनंतपूर येथे भारत ब आणि भारत क यांच्यात सामना होत आहे. गायकवाड हा भारत क संघाचा कर्णधार आहे. पहिल्या डावात तो संघासाठी सलामीला आला होता. मात्र अवघे २ चेंडू खेळल्यानंतर तो जखमी होऊन मैदानाबाहेर गेला. गायकवाडच्या दुखापतीमुळे संघाचा तणाव वाढू शकतो.

वास्तविक भारत ब ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या वेळी ऋतुराज गायकवाड आणि साई सुदर्शन भारत क संघाकडून सलामीला आले. गायकवाडने २ चेंडूंचा सामना करताना एक चौकार मारला. त्याने ४ धावा केल्या आणि दुखापतीमुळे तो मैदानाबाहेर पडला.

स्पोर्टस्टारने दिलेल्या वृत्तानुसार, गायकवाड यांनी आपली पाय मुरगळला आहे. यामुळे त्याला खूप वेदना होत होत्या. गायकवाड सिंगल घेण्यासाठी धावला, त्या दरम्यान त्याचा पाय मुरगळला. मात्र, याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

गायकवाडच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया क ने गेल्या सामन्यात इंडिया डी संघाचा ४ गडी राखून पराभव केला होता. या सामन्याच्या पहिल्या डावात गायकवाडला विशेष काही करता आले नाही. अवघ्या ५ धावा करून तो बाद झाला. दुसऱ्या डावात ४६ धावा केल्या. ऋतुराजने ४८ चेंडूंचा सामना करत ४६ धावा केल्या होत्या. त्याने ८ चौकार मारले होते.

भारत क आणि भारत ब यांच्यातील सामन्याबद्दल बोलायचे झाले तर गायकवाडचा संघ सध्या पहिल्या डावात फलंदाजी करत आहे. वृत्त लिहिपर्यंत भारत क संघाने ४४ षटकांत २ गडी गमावून १९३ धावा केल्या होत्या. साई सुदर्शनने संघासाठी ४३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

त्याने ७५ चेंडूंचा सामना करत ८ चौकार मारले. रजत पाटीदारने ४० धावांची शानदार खेळी केली. त्याने ६७ चेंडूंचा सामना करत ८ चौकार मारले. इशान किशन ६५ आणि बाबा इंद्रजीत २८ धावांवर करत खेळत होते.

Whats_app_banner