Ruturaj Gaikwad Tennis Tournament Opening Ceremony : आगामी आयपीएल २०२५ ही स्पर्धा २२ मार्चपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेत गुणी क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड हा चेन्नई सुपर किंग्जचे (CSK) नेतृत्व करताना दिसणार आहे.
पण याआधीच तो एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. वास्तविक, ऋतुराज गायकवाड रायगडमध्ये टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनसाठी आला होता, तेव्हा त्याला पाहण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी जमली होती. गायकवाड गर्दीतून बाहेर पडत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
एमएस धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांसारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंभोवती या प्रकारची गर्दी अनेकदा पाहायला मिळते. ऋतुराज गायकवाडबद्दल बोलायचे झाले तर, तो फारसे आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला नाही, तरीही हा व्हायरल झालेला व्हिडीओ म्हणजे गायकवाडचा चाहता वर्ग कोणापेक्षा कमी नाही हे दाखवून देणारा आहे.
गायकवाड जेव्हा टेनिस स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला पोहोचला, तेव्हा गर्दी हाताळणे खूप कठीण झाले होते. प्रचंड गर्दीत गायकवाड सुरक्षेने घेरलेला होता.
चेन्नई सुपर किंग्ज २० फेब्रुवारीपासून आयपीएल २०२५ साठी सराव शिबिर सुरू करणार आहे. पहिल्या दिवशी चेन्नई सुपर किंग्जच्या सराव शिबिरात एमएस धोनी, रविचंद्रन अश्विन आणि रुतुराज गायकवाड हे देखील उपस्थित राहणार आहेत. धोनीने आधीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, तर अश्विननेही काही महिन्यांपूर्वीच निवृत्ती घेतली आहे.
तर महाराष्ट्राचा संघ रणजी ट्रॉफीतून बाहेर झाल्याने गायकवाडही सराव शिबिरासाठी उपलब्ध असणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज आयपीएल २०२५ मध्ये त्यांचा पहिला सामना २३ मार्च रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार आहे.
संबंधित बातम्या