RR vs RCB Weather Report : एलिमिनेटर सामन्यात पाऊस पडला तर पुढच्या फेरीत कोण जाईल? नियम काय? जाणून घ्या-rr vs rcb weather report forcast ipl 2024 eliminator match at ahmedabad today rain chances or not ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  RR vs RCB Weather Report : एलिमिनेटर सामन्यात पाऊस पडला तर पुढच्या फेरीत कोण जाईल? नियम काय? जाणून घ्या

RR vs RCB Weather Report : एलिमिनेटर सामन्यात पाऊस पडला तर पुढच्या फेरीत कोण जाईल? नियम काय? जाणून घ्या

May 22, 2024 10:49 AM IST

RR vs RCB Weather Report : आयपीएल २०२४ चा एलिमिनेटर सामना २२ मे रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध आरसीबी यांच्यात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे.

RR vs RCB Weather Report : एलिमिनेटर सामन्यात पाऊस पडला तर पुढच्या फेरीत कोण जाईल? नियम काय? जाणून घ्या
RR vs RCB Weather Report : एलिमिनेटर सामन्यात पाऊस पडला तर पुढच्या फेरीत कोण जाईल? नियम काय? जाणून घ्या

IPL 2024, RCB vs RR Eliminator : आयपीएल २०२४ चा एलिमिनेटर सामना बुधवारी (२२ मे) राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात रंगणार आहे. दोन्ही संघ अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सायंकाळी ७:३० वाजता आमनेसामने येतील. हा सामना दोन्ही संघांसाठी 'करा किंवा मरो' असेल. हा सामना हरणारा संघ स्पर्धेबाहेर जाईल.

तर, विजयी संघ दुसऱ्या क्वालिफायरमध्ये प्रवेश करेल, जिथे त्यांचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होईल. 

सनरायझर्स हैदराबादला पहिल्या क्वालिफायरमध्ये (२१ मे) कोलकाता नाईट रायडर्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता. आयपीएल २०२४ च्या लीग टप्प्याच्या समाप्तीनंतर, राजस्थान रॉयल्स पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर होते तर आरसीबी चौथ्या स्थानावर होते. पॉइंट टेबलमधील तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघांमध्ये एलिमिनेटर सामना खेळला जातो.

राजस्थान रॉयल्सचा शेवटचा साखळी सामना पावसामुळे वाहून गेला होता. तर याआधी त्यांना सलग ४ सामन्यांत पराभव पत्करावा लागला होता. त्याचवेळी आरसीबीने प्लेऑफमध्ये स्वप्नवत प्रवेश केला. फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबीने सलग ६ सामने जिंकून प्लेऑफमध्ये स्थान पक्के केले. त्यांच्या शेवटच्या सामन्यात आरसीबीने गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जचा २७ धावांनी पराभव केला.

दरम्यान, राजस्थान आणि आरसीबी यांच्यातील एलिमिनेटर मॅचची लाईव्ह ॲक्शन संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल. नाणेफेक अर्धा तास आधी होणार आहे. 

अहमदाबादचे हवामान कसे असेल?

या सामन्यात हरणाऱ्या संघाचा प्रवास येथेच संपणार आहे. अशा परिस्थितीत अहमदाबादच्या हवामानाबद्दल बोलायचे झाले तर २२ मे रोजी हवामान ४५ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. सामन्यादरम्यान पावसाची शक्यता नाही. जर या सामन्याचा एक टक्काही पावसामुळे प्रभावित झाला तर हा सामना पूर्ण करण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ दिला जाईल.

पावसाचा व्यत्यय आला तर पुढच्या फेरीत कोण जाईल?

आयपीएलच्या नियमांनुसार प्रत्येक प्लेऑफ सामन्याला १२० मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला आहे. पावसामुळे सामन्यावर परिणाम झाला तर. हा सामना त्याच दिवशी रात्री ९.४० वाजता षटकांमध्ये कोणतीही कपात न करता सुरू होऊ शकतो. अंतिम किंवा एलिमिनेटर सामना टाय झाल्यास किंवा निकाल न लागल्यास सामना सुपर ओव्हरमध्ये जाईल. सुपर ओव्हरमध्येही निकाल लागला नाही, तर मॅचचा विजेता मिेळेपर्यंत पुन्हा सुपर ओव्हर होईल.

त्याच वेळी, जर एलिमिनेटर सामना पावसामुळे वाहून गेला आणि सुपर ओव्हरची कोणतीही शक्यता नसेल, तर साखळी फेरीतील गुणतालिकेच्या आधारावर संघ दुसऱ्या फेरीसाठी निवडला जाईल. पावसामुळे सामना रद्द झाला तर राजस्थान क्वालिफायर दोनमध्ये जाईल.

राजस्थान वि आरसीबी हेड टू हेड

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आतापर्यंत एकूण ३१ सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी RCBने १५ जिंकले तर राजस्थानने १३ जिंकले. दोन सामन्यांचा निकाल लागला नाही. एक सामना रद्द झाला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये दोन सामने झाले. येथे आरसीबी आणि आरआर या दोघांनी प्रत्येकी १ सामना जिंकला आहे.

राजस्थान वि आरसीबी पीच रिपोर्ट

RCB आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील IPL २०२४ चा एलिमिनेटर सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. अहमदाबादची खेळपट्टी सामान्यत: फलंदाजांसाठी अनुकूल असते. त्याचबरोबर या खेळपट्टीवर गोलंदाजांनाही मदत मिळते. येथे खेळल्या गेलेल्या अनेक सामन्यांमध्ये संथ खेळपट्टी दिसली आहे.

चालू आयपीएल हंगामात या मैदानावर एकूण ७ सामने खेळले गेले, त्यापैकी एक सामना पावसामुळे वाहून गेला, तर या मैदानावर दोनदा २०० हून अधिक धावा झाल्या. त्याचवेळी याच मैदानावर गुजरात टायटन्सचा संघ ८९ धावांत ऑलआऊट झाला होता, त्यामुळे या खेळपट्टीवर अत्यंत सावधपणे खेळण्याची गरज आहे.

Whats_app_banner