RR vs RCB Live Steaming : आज कोहली-ट्रेन्ट बोल्ट थरार रंगणार, जयपूरमध्ये भिडणार राजस्थान आणि आरसीबी
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  RR vs RCB Live Steaming : आज कोहली-ट्रेन्ट बोल्ट थरार रंगणार, जयपूरमध्ये भिडणार राजस्थान आणि आरसीबी

RR vs RCB Live Steaming : आज कोहली-ट्रेन्ट बोल्ट थरार रंगणार, जयपूरमध्ये भिडणार राजस्थान आणि आरसीबी

Apr 06, 2024 11:02 AM IST

RR vs RCB Live Steaming : संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्सने आतापर्यंतचे तिन्ही सामने जिंकले आहेत आणि सध्या आयपीएल २०२४ च्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे, तर आरसीबी संघाने चालू हंगामात ४ पैकी फक्त एकच सामना जिंकला आहे.

RR vs RCB Live Steaming :  आज कोहली-ट्रेन्ट बोल्ट थरार रंगणार, जयपूरमध्ये राजस्थान आणि आरसीबी भिडणार
RR vs RCB Live Steaming : आज कोहली-ट्रेन्ट बोल्ट थरार रंगणार, जयपूरमध्ये राजस्थान आणि आरसीबी भिडणार

RR vs RCB Pitch Report : इंडियन प्रीमियर लीग २०२४ चा १९ वा सामना आज (६ एप्रिल) राजस्थान रॉयल्स (RR) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) यांच्यात खेळवला जाईल. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर हा सामना होणार आहे. राजस्थान रॉयल्सची या मोसमात चांगली सुरुवात झाली आहे.

संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्सने आतापर्यंतचे तिन्ही सामने जिंकले आहेत आणि सध्या आयपीएल २०२४ च्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे, तर आरसीबी संघाने चालू हंगामात ४ पैकी फक्त एकच सामना जिंकला आहे. गेल्या सामन्यात आरसीबीचा लखनौने २८ धावांनी पराभव केला होता. 

अशा परिस्थितीत फाफ डू प्लेसिसच्या आरसीबीला आजचा सामना जिंकणे अतिशय महत्वाचे आहे. 

राजस्थान वि. आरसीबी पीच रिपोर्ट 

जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमच्या खेळपट्टीवर फलंदाजांचे वर्चस्व राहिले आहे. पण येथे वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटूंनाही खूप मदत मिळते. या मैदानावर नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतो. मोठे मैदान असल्यामुळे या मैदानावर फलंदाजांना चौकार-षटकार मारणे कठीण जाते.

सवाई मानसिंग स्टेडियम राजस्थान रॉयल्ससाठी लकी

सवाई मानसिंग स्टेडियमवर एकूण १२८ सामने खेळले गेले आहेत, तर या मैदानावर आयपीएलचे एकूण ५२ सामने खेळले गेले आहेत. या मैदानावर खेळल्या गेलेल्या ५२ आयपीएल सामन्यांपैकी यजमान संघाने ३३ सामने जिंकले, तर पाहुण्या संघाने १९ वेळा विजय मिळवला.

राजस्थान वि. आरसीबी हेड टू हेड रेकॉर्ड

राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात २७ वेळा सामना झालाआहे, ज्यामध्ये राजस्थान रॉयल्सने १२ सामने जिंकले आणि आरसीबीने १५ सामने जिंकले. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्स संघाने ५ सामने जिंकले, तर आरसीबीनेही तेवढेच सामने जिंकले आहेत. नंतर फलंदाजी करताना राजस्थान संघाने ७ वेळा विजय मिळवला, तर आरसीबीने १० वेळा विजय मिळवला.

राजस्थान वि. आरसीबी सामना कुठे पाहणार?

राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होईल. अर्धातास आधी नाणेफेक होईल. हा सामना स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर हिंदी आणि इंग्रजीसह देशातील इतर भाषांमध्ये पाहू शकतो. जिओ सिनेमा ॲपवर या सामन्याचे लाईव्ह-स्ट्रीमिंग पाहता येईल. याशिवाय, https://marathi.hindustantimes.com/ वर सामन्याशी संबंधित बातम्या, लाइव्ह अपडेट्स आणि रेकॉर्डही वाचू शकता.

Whats_app_banner