RR vs RCB: राजस्थान- बंगळुरू यांच्यात आज सामना; जाणून घ्या संभाव्य संघ, पीच रिपोर्ट आणि हवामानाचा अंदाज-rr vs rcb ipl 2024 rajasthan royals vs royal challengers bengaluru playing 11 pitch report and jaipur weather updates ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  RR vs RCB: राजस्थान- बंगळुरू यांच्यात आज सामना; जाणून घ्या संभाव्य संघ, पीच रिपोर्ट आणि हवामानाचा अंदाज

RR vs RCB: राजस्थान- बंगळुरू यांच्यात आज सामना; जाणून घ्या संभाव्य संघ, पीच रिपोर्ट आणि हवामानाचा अंदाज

Apr 06, 2024 12:03 PM IST

Rajasthan Royals vs Royal Challengers Bengaluru: राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आयपीएलच्या १९व्या सामन्यात आमनेसामने येणार आहेत.

जयपूरच्या मानसिंह स्टेडियमवर आज राजस्थान आणि बंगळुरू एकमेकांसमोर येणार आहेत.
जयपूरच्या मानसिंह स्टेडियमवर आज राजस्थान आणि बंगळुरू एकमेकांसमोर येणार आहेत.

IPL 2024: आयपीएलच्या १९व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू (Rajasthan Royals vs Royal Challengers Bengaluru) एकमेकांशी भिडणार आहेत. दोघांमधील हा सामना जयपूरच्या (Jaipur) सवाई मानसिंह स्टेडियमवर (Sawai Mansingh Stadium) होणार आहे. या हंगामात राजस्थानने आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत आणि तीनही जिंकले आहेत. दुसरीकडे बंगळुरूच्या संघाला चार पैकी तीन सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. अशा परिस्थितीत दोघांमधील हा संघर्ष खूपच रंजक ठरू शकतो. या सामन्यापूर्वी खेळपट्टीचा अहवाल, कशी असेल दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन आणि हवामानाचा अंदाज काय सांगतोय, हे जाणून घेऊयात.

आयपीएलच्या गेल्या हंगामात राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सवाई मानसिंह स्टेडियमवर आमनेसामने आले होते.ज्यात बंगळुरूच्या संघाने राजस्थानला केवळ ५९ धावांवर ऑलआऊट केले होते आणि ११२ धावांनी विजय मिळवला होता.बंगळुरूच्या संघाने हा सामना एकतर्फी जिंकला होता.

RR vs RCB Head to Head: राजस्थान- बंगळुरूमध्ये कोणत्या संघाचा वरचष्मा? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड

पीच रिपोर्ट

जयपूरची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल ठरेल, अशी अपेक्षा केली जात आहे. जयपूरच्या मानसिंह स्टेडियमवर आतापर्यंत खेळल्या गेलेल्या दोन सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने १८५ धावा केल्या आहेत. तर, लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाच्या पदरी निराशा पडली आहे. यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

वडील IPS अधिकारी तर मुलगा गोलंदाजांसाठी विलन... मुंबईकडून खेळलेला शशांक सिंग आहे तरी कोण? पाहा

हवामानाचा अंदाज

जयपूरमध्ये ६ एप्रिल २०२४ रोजी पावसाची शक्यता नाही. जयपूरमध्ये संध्याकाळी तापमान ३० अंश सेल्सिअस आणि आर्द्रता सुमारे २० टक्के राहील, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

संभाव्य संघ:

राजस्थान रॉयल्स : यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टिरक्षक), रायन पराग, रविचंद्रन अश्विन, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, ट्रेंट बोल्ट, नांद्रे बर्गर, युजवेंद्र चहल, आवेश खान.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, कॅमेरून ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, अनुज रावत, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), मोहम्मद सिराज, यश दयाल, मयंक डागर, रीस टोप्ले.

Whats_app_banner
विभाग