मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  RR vs RCB Dream 11 Prediction : एलिमिनेटर सामन्यात कोहली-सॅमसन आमनेसामने, ड्रीम इलेव्हनवर अशी बनवा तुमची परफेक्ट टीम

RR vs RCB Dream 11 Prediction : एलिमिनेटर सामन्यात कोहली-सॅमसन आमनेसामने, ड्रीम इलेव्हनवर अशी बनवा तुमची परफेक्ट टीम

May 22, 2024 10:25 AM IST

RR vs RCB Dream 11 Prediction : राजस्थान रॉयल्सचा शेवटचा साखळी सामना पावसामुळे वाहून गेला होता. तर याआधी त्यांना सलग ४ सामन्यांत पराभव पत्करावा लागला होता. त्याचवेळी आरसीबीने प्लेऑफमध्ये स्वप्नवत प्रवेश केला.

RR vs RCB Dream 11 Prediction
RR vs RCB Dream 11 Prediction (AFP)

IPL 2024, RCB vs RR Eliminator : आयपीएल २०२४ चा एलिमिनेटर सामना बुधवारी (२२ मे) राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात रंगणार आहे. दोन्ही संघ अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सायंकाळी ७:३० वाजता आमनेसामने येतील. हा सामना दोन्ही संघांसाठी 'करा किंवा मरो' असेल. हा सामना हरणारा संघ स्पर्धेबाहेर जाईल.

ट्रेंडिंग न्यूज

तर, विजयी संघ दुसऱ्या क्वालिफायरमध्ये प्रवेश करेल, जिथे त्यांचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होईल.

सनरायझर्स हैदराबादला पहिल्या क्वालिफायरमध्ये (२१ मे) कोलकाता नाईट रायडर्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता. आयपीएल २०२४ च्या लीग टप्प्याच्या समाप्तीनंतर, राजस्थान रॉयल्स पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर होते तर आरसीबी चौथ्या स्थानावर होते. पॉइंट टेबलमधील तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघांमध्ये एलिमिनेटर सामना खेळला जातो.

राजस्थान रॉयल्सचा शेवटचा साखळी सामना पावसामुळे वाहून गेला होता. तर याआधी त्यांना सलग ४ सामन्यांत पराभव पत्करावा लागला होता. त्याचवेळी आरसीबीने प्लेऑफमध्ये स्वप्नवत प्रवेश केला. फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबीने सलग ६ सामने जिंकून प्लेऑफमध्ये स्थान पक्के केले. त्यांच्या शेवटच्या सामन्यात आरसीबीने गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जचा २७ धावांनी पराभव केला.

दरम्यान, राजस्थान आणि आरसीबी यांच्यातील एलिमिनेटर मॅचची लाईव्ह ॲक्शन संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल. नाणेफेक अर्धा तास आधी होणार आहे.

राजस्थान असो की आरसीबी, दोन्ही संघांकडे तगड्या खेळाडूंची फौज आहे. अशा परिस्थितीत या सामन्यासाठी ड्रीम-इलेव्हन (Dream 11 todays match team prediction) निवडणे निश्चितच खूप कठीण काम असेल, पण येथे आम्ही तुमची काही प्रमाणात मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

RR vs RCB Dream 11 Prediction

यष्टिरक्षक - दिनेश कार्तिक, संजू सॅमसन (उपकर्णधार)

फलंदाज - विराट कोहली (कर्णधार), फाफ डू प्लेसिस, रियान पराग, टॉम कोलर-कॅडमोर.

अष्टपैलू - ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरून ग्रीन.

गोलंदाज - यश दयाल, युझवेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट.

राजस्थान वि आरसीबी हेड टू हेड

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आतापर्यंत एकूण ३१ सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी RCBने १५ जिंकले तर राजस्थानने १३ जिंकले. दोन सामन्यांचा निकाल लागला नाही. एक सामना रद्द झाला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये दोन सामने झाले. येथे आरसीबी आणि आरआर या दोघांनी प्रत्येकी १ सामना जिंकला आहे.

राजस्थान वि आरसीबी पीच रिपोर्ट

RCB आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील IPL २०२४ चा एलिमिनेटर सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. अहमदाबादची खेळपट्टी सामान्यत: फलंदाजांसाठी अनुकूल असते. त्याचबरोबर या खेळपट्टीवर गोलंदाजांनाही मदत मिळते. येथे खेळल्या गेलेल्या अनेक सामन्यांमध्ये संथ खेळपट्टी दिसली आहे.

चालू आयपीएल हंगामात या मैदानावर एकूण ७ सामने खेळले गेले, त्यापैकी एक सामना पावसामुळे वाहून गेला, तर या मैदानावर दोनदा २०० हून अधिक धावा झाल्या. त्याचवेळी याच मैदानावर गुजरात टायटन्सचा संघ ८९ धावांत ऑलआऊट झाला होता, त्यामुळे या खेळपट्टीवर अत्यंत सावधपणे खेळण्याची गरज आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४