RR vs RCB Dream11 Prediction : कर्णधार-उपकर्णधार कोण असेल? आज अशी बनवा तुमची ड्रीम इलेव्हन टीम, पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  RR vs RCB Dream11 Prediction : कर्णधार-उपकर्णधार कोण असेल? आज अशी बनवा तुमची ड्रीम इलेव्हन टीम, पाहा

RR vs RCB Dream11 Prediction : कर्णधार-उपकर्णधार कोण असेल? आज अशी बनवा तुमची ड्रीम इलेव्हन टीम, पाहा

Apr 06, 2024 11:26 AM IST

RR vs RCB Dream11 Prediction : आयपीएल २०२४ मध्ये आज राजस्थान रॉयल्स आणि आरसीबी आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघांमधील हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहेत.

RR vs RCB Dream11 Prediction कर्णधार-उपकर्णधार कोण असेल? आज अशी बनवा तुमची ड्रीम इलेव्हन टीम, पाहा
RR vs RCB Dream11 Prediction कर्णधार-उपकर्णधार कोण असेल? आज अशी बनवा तुमची ड्रीम इलेव्हन टीम, पाहा

 tRR vs RCB Playibg 11 Prediction : आयपीएल २०२४ मध्ये आज शनिवारी (६ एप्रिल) राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात जबरदस्त सामना पाहायला मिळणार आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर सायंकाळी ७:३० वाजेपासून हा सामना खेळला जाईल. 

यंदाच्या मोसमात संजू सॅमसनची राजस्थान रॉयल्स जबरदस्त फॉर्मात दिसत आहे. तर विराट कोहलीची आरसीबी नेहमीप्रमाणे चोकर्सच्या भुमिका बजावत आहे. राजस्थानचा संघ पहिले तीन सामने जिंकून पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. तर बेंगळुरू सध्या फक्त एक विजय आणि तीन पराभवांसह संघर्ष करताना दिसत आहे.

दरम्यान, राजस्थान असो की आरसीबी , दोन्ही संघांकडे तगड्या खेळाडूंची फौज आहे. अशा परिस्थितीत या सामन्यासाठी ड्रीम-इलेव्हन (Dream 11 todays match taam prediction) निवडणे निश्चितच खूप कठीण काम असेल, पण येथे आम्ही तुमची काही प्रमाणात मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

या सामन्यासाठी तुमचा ड्रीम इलेव्हन संघ कसा असावा आणि तुमच्या संघाचा कर्णधार आणि उपकर्णधार म्हणून कोण योग्य ठरू शकतो, हे आपण येथे पाहणार आहोत.

RR vs RCB ड्रीम इलेव्हन फॅन्टसी टीम

यष्टिरक्षक : संजू सॅमसन

फलंदाज: विराट कोहली (उपकर्णधार), फाफ डू प्लेसिस, यशस्वी जैस्वाल

अष्टपैलू: रियान पराग (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरून ग्रीन

गोलंदाज: युझी चहल, ट्रेंट बोल्ट, रीस टोपली, नांद्रे बर्गर

RR vs RCB पीच रिपोर्ट 

जयपूरची खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली मानली जाते, कारण येथे चेंडू बॅटवर चांगला येतो. नव्या चेंडूने गोलंदाजांना भरपूर स्विंग मिळेल, तर फिरकीपटूंनाही थोडा टर्न मिळेल. या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करतो.

RR vs RCB संभाव्य प्लेइंग इलेव्हन

राजस्थान रॉयल्स : जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टिरक्षक), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रवी अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, नांद्रे बर्गर, युझी चहल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), कॅमेरॉन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), मयंक डागर, रीस टोपली, मोहम्मद सिराज, यश दयाल.

Whats_app_banner