मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  RR vs MI Live Streaming: आज मुंबई इंडियन्स बलाढ्य राजस्थान रॉयल्सशी भिडणार; कधी, कुठे पाहायचा सामना?

RR vs MI Live Streaming: आज मुंबई इंडियन्स बलाढ्य राजस्थान रॉयल्सशी भिडणार; कधी, कुठे पाहायचा सामना?

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Apr 22, 2024 10:29 AM IST

Rajasthan Royals vs Mumbai Indians Live Streaming: मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील लाईव्ह सामना कधी आणि कुठे पाहायचा, हे जाणून घेऊयात.

आयपीएल २०२४: राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आज लढत पाहायला मिळणार आहे.
आयपीएल २०२४: राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आज लढत पाहायला मिळणार आहे.

IPL 2024: आयपीएल २०२४ च्या ३८व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सामना मुंबई इंडियन्सशी (Rajasthan Royals vs Mumbai Indians) होणार आहे. या हंगामात राजस्थानने जबरदस्त कामगिरी करून दाखवली. राजस्थानने आतापर्यंत खेळलेल्या सात पैकी सहा सामन्यात विजय मिळवला. तर, फक्त एका सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. दुसरीकडे, हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्त्वाखाली मुंबई इंडियन्सला सात सामन्यापैकी फक्त सामने जिंकता आले आहेत आणि चार सामन्यात पराभव पत्कारावा लागला.

ट्रेंडिंग न्यूज

PBKS vs GT : गुजरात टायटन्सचा चौथा विजय…गुणतालिकेत घेतली मोठी झेप, पंजाब किंग्जचा घरच्या मैदानावर पराभव

कधी, कुठे आणि कसा पाहायचा सामना?

राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रविवारी (२२ एप्रिल २०२४) आयपीएलमधील ३८वा सामना खेळला जाईल. हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, राजस्थान आणि मुंबई यांच्यातील सामना सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होईल. यापूर्वी अर्धातास नाणेफेक होईल. हा सामना स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर हिंदी आणि इंग्रजीसह देशातील इतर भाषांमध्ये पाहू शकतो. जिओ सिनेमा ॲपवर या सामन्याचे लाईव्ह-स्ट्रीमिंग पाहता येईल. याशिवाय, https://marathi.hindustantimes.com वर सामन्याशी संबंधित बातम्या, लाइव्ह अपडेट्स आणि रेकॉर्डही वाचू शकता.

Virat Kohli : विराट कोहलीने केला विश्वविक्रम, टी-20 क्रिकेटच्या इतिहासात असे करणारा पहिलाच फलंदाज ठरला

मुंबई इंडियन्स संघ:

इशान किशन (विकेटकिपर), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, श्रेयस गोपाल, जसप्रीत बुमराह, आकाश मधवाल, नुवान तुषारा, कुमार कार्तिकेय, पियुष चावला, नमन धीर, ल्यूक वुड, हार्विक देसाई, शम्स मुलानी, अर्जुन तेंडुलकर, नेहल वढेरा, शिवालिक शर्मा, अंशुल कंबोज, देवाल्ड ब्रेविस, क्वेना मफाका.

राजस्थान रॉयल्स संघ:

यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (विकेटकिपर आणि कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, कुलदीप सेन, युजवेंद्र चहल, जोस बटलर, टॉम कोहलर-कॅडमोर, शुभम दुबे, नवदीप सैनी, नांद्रे बर्गर, संदीप शर्मा, केशव महाराज, तनुष कोटियन, डोनोवन फरेरा, आबिद मुश्ताक, कुणाल सिंह राठौर.

IPL_Entry_Point