RR Vs MI Highlights : जयपूरमध्ये यशस्वी जैस्वालचं तुफानी शतक, मुंबईचा पाचवा पराभव
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  RR Vs MI Highlights : जयपूरमध्ये यशस्वी जैस्वालचं तुफानी शतक, मुंबईचा पाचवा पराभव

RR Vs MI Highlights : जयपूरमध्ये यशस्वी जैस्वालचं तुफानी शतक, मुंबईचा पाचवा पराभव

Apr 23, 2024 12:00 AM IST

RR Vs MI IPL Score : आयपीएल २०२४ मध्ये आज राजस्थान आणि मुंबई यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यतात राजस्थानने ९ विकेट्सनी विजय मिळवला.

RR Vs MI Highlights : जयपूरमध्ये यशस्वी जैस्वालचं तुफानी शतक, मुंबईचा पाचवा पराभव
RR Vs MI Highlights : जयपूरमध्ये यशस्वी जैस्वालचं तुफानी शतक, मुंबईचा पाचवा पराभव (AP)

इंडियन प्रीमियर लीग २०२४ चा ३८वा सामना राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थानने मुंबईचा ९ विकेट्सनी धुव्वा उडवला.

राजस्थानकडून यशस्वी जैस्वालने ६० चेंडूत नाबाद १०४ धावांची खेळी केली. त्याच्या बॅटमधून ९ चौकार आणि ७ षटकार आले. तर कर्णधार संजू सॅमसन ३८ धावा करून नाबाद परतला. 

तत्पूर्वी, मुंबईने प्रथम खेळून १७९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात राजस्थानने ८ चेंडू शिल्लक असताना लक्ष्याचा सहज पाठलाग केला. जयस्वाल आणि बटलरचे झेल सोडणे मुंबईला महागात पडले.

राजस्थान वि. मुंबई क्रिकेट स्कोअर

यशस्वी जैस्वालचे अर्धशतक

राजस्थान रॉयल्सचा सलामीचा फलंदाज यशस्वी जैस्वाल दमदार फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याने या मोसमातील पहिले अर्धशतक झळकावले आहे. यासाठी त्याने ३१ चेंडूंची मदत घेतली. त्याचे आयपीएल कारकिर्दीतील हे नववे अर्धशतक आहे.

सामना पुन्हा सुरु

पावसामुळे थांबलेला सामना पुन्हा एकदा सुरु झाला आहे. हा सामना कोणत्याही धावा किंवा षटकं कपातीशिवाय खेळवला जात आहे. राजस्थानची सलामीची जोडी क्रीझवर पोहोचली आहे. मोहम्मद नबी डावातील सातवे षटक टाकत आहे.

पावसाने लावली हजेरी

राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यात पावसाने हजेरी लावली आहे. जयपूरमध्ये हलक्या रिमझिम पावसामुळे सामना थांबवण्यात आला आहे. मैदान कव्हरच्या साह्याने झाकण्यात आले आहे.

राजस्थानची शानदार सुरुवात

जोस बटलर आणि यशस्वी जैस्वाल जबरदस्त फॉर्मात दिसत आहेत. दोघेही मुंबईच्या गोलंदाजांना तडाखा देत आहेत. जैस्वालने १८ चेंडूत ३१ तर बटलरने २८ धावा केल्या आहेत. ६ षटकांनंतर संघाची धावसंख्या ६१/० आहे. राजस्थानला विजयासाठी ८४ चेंडूत ११९ धावांची गरज आहे.

मुंबईच्या १७९ धावा

मुंबईने २० षटकांत ९ विकेट गमावून राजस्थानविरुद्ध १७९ धावा केल्या आहेत. या सामन्यात संदीप शर्माने ५ विकेट घेतल्या.

मुंबईची सुरुवात खूपच खराब झाली. ८व्या षटकात ४ फलंदाज केवळ ५२ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले होते. यानंतर नेहल वढेरा आणि तिलक वर्मा यांनी ९९ धावांची भागीदारी केली. वढेराने ४९ आणि तिलकने ६५ धावा केल्या. मात्र, अखेरच्या षटकांमध्ये राजस्थानने शानदार पुनरागमन केले. संदीप शर्माने १८ धावांत ५ बळी घेतले.

हार्दिक पंड्या बाद

राजस्थान रॉयल्सविरुद्ध सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या हार्दिक पंड्याला काही विशेष करता आले नाही. त्याला आवेश खानने एलबीडब्ल्यू आऊट केले. पंड्याला १० चेंडूत केवळ १० धावा करता आल्या. टीम डेव्हिड आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. 

मुंबई इंडियन्सला पाचवा धक्का

नेहल वढेराच्या रूपाने मुंबई इंडियन्सला पाचवा धक्का बसला. तो ट्रेंट बोल्टचा बळी ठरला. २४ चेंडूत ४९ धावा करून नेहल माघारी परतला. त्याचे अर्धशतक एका धावेने हुकले. नेहल आणि टिळक यांच्यात पाचव्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी झाली. हार्दिक पंड्या सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे.

मुंबईची दमदार फलंदाजी

नेहल वढेरा आणि तिलक वर्मा यांनी ३९ चेंडूत ६८ धावांची भागीदारी करून सामन्याला कलाटणी दिली. १४ षटकांनंतर मुंबईची धावसंख्या ४ गड्यांच्या मोबदल्यात १२० धावा आहे. वर्मा ३४ चेंडूत ४३ तर नेहल वढेरा १७ चेंडूत ३१ धावांवर खेळत आहे. वर्माने ४ चौकार आणि एक षटकार मारला आहे. तर वढेराने २ चौकार आणि २ षटकार मारले आहेत.

तिलक वर्मा-नेहल वढेराने डाव सावरला

तिलक वर्मा आणि नेहल वढेरा यांच्यात चांगली भागीदारी झाली आहे. दोघांनी ३५ धावांची नाबाद भागीदारी केली आहे. दोन्ही फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचे दिसत आहे. १२ षटकांनंतर संघाची धावसंख्या ४ बाद ९५ आहे.

मुंबईला तिसरा धक्का

संदीप शर्माने सूर्यकुमार यादवला बाद करून मुंबईला तिसरा धक्का दिला आहे. सूर्यकुमार यादव ८  चेंडूत १० धावा करून बाद झाला. या सामन्यात मुंबईची सुरुवात चांगली झाली नाही आणि संघाने अवघ्या २० धावांत ३ विकेट गमावल्या आहेत.

मुंबईला दुसरा धक्का

दुसऱ्याच षटकात इशान किशनच्या रूपाने मुंबईला दुसरा धक्का बसला. संदीप शर्माने त्याला आपला बळी बनवले. किशन शुन्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला. मुंबईचे दोन्ही सलामीचे फलंदाज बाद झाले आहेत. चौथ्या क्रमांकावर तिलक वर्मा फलंदाजीसाठी आला आहे. सूर्यकुमार यादव क्रीजवर आहे. दोन षटकांनंतर संघाची धावसंख्या २ बाद ९आहे.

रोहित शर्मा बाद 

मुंबई इंडियन्सला पहिल्या षटकातच पहिला धक्का बसला. ट्रेंट बोल्टने रोहित शर्माला बळी बनवले. त्याला केवळ ६ धावा करता आल्या. सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे.

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.

इम्पॅक्ट सब: जोस बटलर, केशव महाराज, शुभम दुबे, नवदीप सैनी, टॉम कोहलर-कॅडमोर.

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टीम डेव्हिड, नेहल वढेरा, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह.

इम्पॅक्ट सब: नुवान तुषारा, आकाश मधवाल, नमन धीर, शम्स मुलानी, डिवाल्ड ब्रेविस.

मुंबईने टॉस जिंकला

मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात मुंबई ३ बदलांसह खेळणार आहे. आकाश मधवाल, रोमारियो शेफर्ड आणि श्रेयस गोपाल यांच्या जागी नुवान तुषारा, नेहल वढेरा आणि पियुष चावला सामना खेळणार आहेत. त्याचवेळी राजस्थानच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल करण्यात आला आहे. कुलदीप सेनच्या जागी संदीप शर्माचे पुनरागमन झाले आहे.

Whats_app_banner