आयपीएल २०२४च्या ३८ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सामना मुंबई इंडियन्सशी होणार आहे. आज (२२ एप्रिल) जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान संघ यंदाच्या मोसमात उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे.
राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत ७ पैकी ६ सामने जिंकले आहेत, तर एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. दुसरीकडे, मुंबई इंडियन्स संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत आता राजस्थानच्या घरच्या मैदानावर दोन्ही संघांमध्ये हाय-व्होल्टेज सामना रंगणार आहे.
दरम्यान, राजस्थान असो की मुंबई, दोन्ही संघांकडे तगड्या खेळाडूंची फौज आहे. अशा परिस्थितीत या सामन्यासाठी ड्रीम-इलेव्हन (Dream 11 todays match team prediction) निवडणे निश्चितच खूप कठीण काम असेल, पण येथे आम्ही तुमची काही प्रमाणात मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत.
यष्टिरक्षक- जोस बटलर, संजू सॅमसन, इशान किशन
फलंदाज- रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, यशस्वी जैस्वाल अष्टपैलू- हार्दिक पंड्या, रियान पराग
गोलंदाज- युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह
कर्णधार- सूर्यकुमार यादव, उपकर्णधार- रोहित शर्मा
आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात एकूण ३० सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये मुंबई इंडियन्सचा वरचष्मा आहे. मुंबई संघाने १६ सामने जिंकले, तर राजस्थान संघाने १३ सामने जिंकले. एक सामना अनिर्णित राहिला आहे. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान संघाने ३ सामने जिंकले, तर मुंबई इंडियन्सने ८ सामने जिंकले.
जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल आहे. ही खेळपट्टी चांगली उसळी देते आणि फलंदाज अनेक मोठे फटके मारताना दिसतात. या खेळपट्टीवर फिरकीपटूंनाही फायदा होतो.
मुंबई इंडियन्स- रोहित शर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टीम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, श्रेयस गोपाल, जसप्रीत बुमराह.
राजस्थान रॉयल्स- यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार/विकेटकीपर), रियान पराग, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, युझवेंद्र चहल.