RR vs LSG Dream 11 Team Prediction : इंडियन प्रीमियर लीग २०२४ चा चौथा सामना आज रविवारी (२४ मार्च) राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात होणार आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होईल.
दोन्ही संघांना आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने करायची आहे. लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल दीर्घ कालावधीनंतर पुनरागमन करत आहे.
जर तुम्हाला आयपीएलदरम्यान फँटसी क्रिकेट खेळण्याची आवड असेल तर तुम्ही आजचा संघ अशा प्रकारे बनवू शकता.
यष्टिरक्षक- जोस बटलर (कर्णधार), संजू सॅमसन, क्विंटन डी कॉक (उपकर्णधार), केएल राहुल
फलंदाज- यशस्वी जैस्वाल
अष्टपैलू- रविचंद्रन अश्विन, मार्कस स्टॉइनिस, कृणाल पंड्या
गोलंदाज- युझवेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट, रवी बिश्नोई
राजस्थान रॉयल्स : यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टिरक्षक), रोवमन पॉवेल, शिमरॉन हेटमायर, रायन पराग, ध्रुव जुरेल, आर अश्विन, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, आवेश खान, युझवेंद्र चहल.
लखनौ सुपर जायंट्स : केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, निकोलस पूरन, मार्कस स्टॉइनिस, क्रुणाल पांड्या, आयुष बदोनी, शिवम मावी, शामर जोसेफ, रवी बिश्नोई, मोहसिन खान.
आयपीएलमध्ये आतापर्यंत लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात एकूण ३ लढती झाल्या आहेत, ज्यामध्ये राजस्थानचा वरचष्मा राहिला आहे. राजस्थानने ३ पैकी २ सामने जिंकले आहेत.
आयपीएल २०२२ मध्ये दोन्ही संघांमध्ये दोन सामने खेळले गेले, ज्यामध्ये लखनौने दोन्ही सामने गमावले होते. मागील हंगामात दोन्ही संघांमध्ये १ सामना खेळला गेला होता आणि एलएसजीने हा सामना १० गडी राखून जिंकला होता.
संबंधित बातम्या