आयपीएल २०२४ चा चौथा सामना (२४ मार्च) राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळला जात आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर राजस्थानने निर्धारित २० षटकात ४ बाद १९३ धावा केल्या आहेत. लखनौला सामना जिंकण्यासाठी १९४ धावा कराव्या लागणार आहेत.
राजस्थानकडून कर्णधार संजू सॅमसनने नाबाद ८२ धावा केल्या.त्याने कर्णधारपदाला साजेशी खेळी खेळताना ५२ चेंडूत ३ चौकार आणि ६ षटकार ठोकले. त्याच्याशिवाय रियान परागने २९ चेंडूत ४३ धावा केल्या. त्याने ३ षटकार आणि एक चौकार मारला. तर शेवटी ध्रुव जुरेल १२ चेंडूत २० धावा करून नाबाद राहिला.
तत्पूर्वी, टॉस जिंकून फलंदाजीला आलेल्या राजस्थान रॉयल्सची सुरुवात चांगली झाली नाही आणि पॉवरप्लेमध्येच त्यांनी दोन गडी गमावले. जोस बटलर प्रथम बाद झाला, त्याला नवीन उल्हकने बाद केले. त्यानंतर चांगली फलंदाजी करणाऱ्या यशस्वी जैस्वालने मोहसीन खानच्या चेंडूवर आपली विकेट गमावली. बटलरने ९ चेंडूत ११ तर यशस्वी जैस्वालने १२ चेंडूत २४ धावा केल्या.
४९ धावांवर २ गडी बाद झाल्यानंतर कर्णधार संजू सॅमसन आणि रायन पराग यांनी ८३ धावांची भागीदारी करून डावाला गती दिली.
लखनौ सुपर जायंट्स: क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, केएल राहुल (कर्णधार), निकोलस पूरन, मार्कस स्टॉइनिस, आयुष बडोनी, क्रुणाल पंड्या, नवीन-उल-हक, रवी बिश्नोई. यश ठाकूर, मोहसीन खान.
इम्पॅक्ट सब : दीपक हुडा, मयंक यादव, अमित मिश्रा, प्रेरक मंकड, कृष्णप्पा गौतम.
राजस्थान रॉयल्स: यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टिरक्षक), शिमरॉन हेटमायर, रायन पराग, ध्रुव जुरेल, आर अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा.
इम्पॅक्ट सब: रोवमन पॉवेल, नांद्रे बर्गर, तनुष कोटियन, शुभम दुबे आणि कुलदीप सेन.