मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  RR Vs LSG Highlights : रोमहर्षक सामन्यात राजस्थानने मारली बाजी, केएल राहुल-निकोलस पुरनची अर्धशतकं व्यर्थ

RR Vs LSG Highlights : रोमहर्षक सामन्यात राजस्थानने मारली बाजी, केएल राहुल-निकोलस पुरनची अर्धशतकं व्यर्थ

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 24, 2024 07:36 PM IST

RR Vs LSG IPL Highlights : आयपीएल २०२४ चा चौथा सामना (२४ मार्च) राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेला. जयपूरच्या सवाई मानसिंग क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात राजस्थानने २० धावांनी विजय मिळवला.

RR Vs LSG IPL Highlights ipl 2024 रोमहर्षक सामन्यात राजस्थानने मारली बाजी, केएल राहुल-निकोलस पुरनची अर्धशतकं व्यर्थ
RR Vs LSG IPL Highlights ipl 2024 रोमहर्षक सामन्यात राजस्थानने मारली बाजी, केएल राहुल-निकोलस पुरनची अर्धशतकं व्यर्थ (AP)

RR Vs LSG IPL Scorecard : आयपीएल २०२४ चा चौथा सामना आज (२४ मार्च) राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात राजस्थानने २० धावांनी विजय मिळवला.

जयपूरच्या सवाई मानसिंग क्रिकेट स्टेडियमवर राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि २० षटकात १९३ धावा ठोकल्या. प्रत्युत्तरात १९४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौचा संघ ६ गड्यांच्या मोबदल्यात १७३ धावाच करू शकला.

लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौ सुपर जायंट्सची सुरुवात विशेष झाली नाही त्यांनी अवघ्या ६० धावांत ४ गडी गमावले. क्विंटन डी कॉक (४) आणि देवदत्त पडिक्कल (०) यांना वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने बाद केले. तर आयुष बडोनी (१) याला दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज नांद्रे बर्गरने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. इम्पॅक्ट खेळाडू दीपक हुडा (२६) याला युझवेंद्र चहलने आपल्या फिरकीत अडकले.

येथून कर्णधार केएल राहुल आणि निकोलस पुरन यांनी लखनौ सुपर जायंट्सला सामन्यात परत आणले. राहुल आणि निकोलस पुरन यांच्यात पाचव्या विकेटसाठी ८५ धावांची भागीदारी झाली. राहुलने ४४ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह ५८ धावा केल्या. संदीप शर्माने राहुलला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. राहुलनंतर मार्कस स्टॉइनिसनेही लगेच पॅव्हेलियनमध्ये परतला.

येथून विजयाची जबाबदारी निकोलस पुरनवर होती, मात्र तो संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. पुरणने ४१ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ६४ धावा केल्या. राजस्थान रॉयल्सचे वेगवान गोलंदाज संदीप शर्मा आणि आवेश खान यांनी डेथ ओव्हर्समध्ये शानदार गोलंदाजी केली.

राजस्थानचा डाव

राजस्थानकडून कर्णधार संजू सॅमसनने नाबाद ८२ धावा केल्या.त्याने कर्णधारपदाला साजेशी खेळी खेळताना ५२ चेंडूत ३ चौकार आणि ६ षटकार ठोकले. त्याच्याशिवाय रियान परागने २९ चेंडूत ४३ धावा केल्या. त्याने ३ षटकार आणि एक चौकार मारला. तर शेवटी ध्रुव जुरेल १२ चेंडूत २० धावा करून नाबाद राहिला.

तत्पूर्वी, टॉस जिंकून फलंदाजीला आलेल्या राजस्थान रॉयल्सची सुरुवात चांगली झाली नाही आणि पॉवरप्लेमध्येच त्यांनी दोन गडी गमावले. जोस बटलर प्रथम बाद झाला, त्याला नवीन उल्हकने बाद केले. त्यानंतर चांगली फलंदाजी करणाऱ्या यशस्वी जैस्वालने मोहसीन खानच्या चेंडूवर आपली विकेट गमावली. बटलरने ९ चेंडूत ११ तर यशस्वी जैस्वालने १२ चेंडूत २४ धावा केल्या.

४९ धावांवर २ गडी बाद झाल्यानंतर कर्णधार संजू सॅमसन आणि रायन पराग यांनी ८३ धावांची भागीदारी करून डावाला गती दिली.

WhatsApp channel