IPL 2024: आयपीएलच्या सतराव्या हंगामातील चौथ्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स (RR vs LSG) आज एकमेकांशी भिडणार आहेत. हा सामना जयपूरच्या (Jaipur) सवाई मानसिंह स्टेडियमवर (Sawai Mansingh Stadium) खेळला जाणार आहे. दोन्ही संघ या हंगामातील आपपला पहिला सामना खेळण्यासाठी मैदानात उतरतील. दरम्यान, राजस्थान आणि लखनौ यांच्यातील सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग कधी आणि कुठे बघायचे? हे जाणून घेऊयात.
राजस्थान रॉयल्सच्या संघात आक्रमक फलंदाज आहेत. कर्णधार संजू सॅमसन व्यतिरिक्त यशस्वी जैस्वाल आणि जोस बटलर हे उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत दमदार कामगिरी करणारा ध्रुव जुरेल हा संघात चांगला फिनिशर आहे. सॅमसन वेस्ट इंडिजच्या शिमरॉन हेटमायर आणि रोव्हमन पॉवेलला संघात ठेवून मधल्या फळी मजबूत करण्याचा प्रयत्न करू शकतो.
लखनौच्या संघात कर्णधार राहुल व्यतिरिक्त, त्याच्या फलंदाजीची जबाबदारी क्विंटन डी कॉक, मार्कस स्टॉयनिस आणि निकोलस पूरन यांच्यावर असेल. लखनऊमध्ये रवी बिश्नोईचा एक उपयुक्त फिरकी गोलंदाज आहे, जो आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करून विश्वचषक संघात स्थान मिळवण्याचा प्रयत्न करेल.
-आयपीएल २०२४ च्या चौथ्या सामना राजस्थान आणि लखनौ एकमेकांशी भिडणार आहेत. हा सामना २४ मार्च २०२४ रोजी होणार आहे.
-राजस्थान आणि लखनौ यांच्यातील सामना जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
-राजस्थान आणि लखनौ यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार, दुपारी ३.३० वाजता खेळवला जाईल. यापूर्वी अर्धातास म्हणजेच ३ वाजता नाणेफेक होईल.
-आयपीएलच्या प्रसारणाचे अधिकार स्टार स्पोर्ट्सकडे आहेत. स्टार स्पोर्ट्स 1 HD वर इंग्लिशमध्ये लाइव्ह कॉमेंट्री उपलब्ध असेल. तर, हिंदी भाषेत सामन्याचा आनंद घेण्यासाठी स्टार स्पोर्ट्स हिंदी HD हा पर्याय आहे. याशिवाय, बंगाली, कन्नड, तेलगू आणि तामिळसह इतर भाषांमध्ये कॉमेंट्री ऐकता येणार आहे.
-भारतातील जिओ सिनेमा ॲपवर या सामन्याचे लाईव्ह-स्ट्रीमिंग पाहता येईल. याशिवाय तुम्ही marathi.hindustantimes.com वर सामन्याशी संबंधित बातम्या, लाइव्ह अपडेट्स आणि रेकॉर्डही वाचू शकता.
-हा सामना जिओ सिनेमावर प्रसारित होत आहे. या ॲपमध्ये थेट सामने पाहण्यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क भरण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या फोनमध्ये Jio Cinema ॲप इन्स्टॉल करून आयपीएलचा सामना मोफत पाहू शकता.