IPL 2024: आयपीएलच्या चौथ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सामना लखनौ सुपर जायंट्सशी होणार आहे. हा सामना राजस्थानचे होम ग्राउंड सवाई मानसिंह स्टेडियम, जयपूर येथे दुपारी ३.३० वाजता सुरू होईल. दोन्ही संघ या हंगामातील आपपला पहिला सामना खेळण्यासाठी मैदानात उतरतील. संजू सॅमसन आणि केएल राहुल यांच्या नेतृत्वाखालील संघाची एकमेकांविरुद्ध आकडेवारी कशी आहे, हे बघूया.
लखनौच्या संघाने २०२२ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. यामुळे लखनौ आणि राजस्थान यांच्यात फारसे सामने खेळले गेले नाहीत. दोन्ही संघांमधील हेड-टू-हेडची आकडेवारी पाहिली तर राजस्थानचा वरचष्मा दिसतो. लखनौ आणि राजस्थान आतापर्यंत तीन वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यात राजस्थान रॉयल्सने दोन आणि लखनौ सुपर जायंट्सने एक सामना जिंकला आहे.
जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात आतापर्यंत एकच सामना खेळला गेला आहे. हा सामना लखनौने जिंकला आहे. या सामन्यात लखनौने राजस्थानचा १० धावांनी पराभव केला. आयपीएल २०२३ च्या २६ व्या सामन्यात लखनौने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ७ विकेट्स गमावून १५४ धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सला निर्धारित षटकांत ६ विकेट्स गमावून केवळ १४४ धावापर्यंत मजल मारता आली.
राजस्थान रॉयल्स: जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार, विकेटकिपर), शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, रियान पराग, शुभम दुबे, रविचंद्रन अश्विन, आवेश खान, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा, नवदीप सैनी , टॉम कोहलर-कॅडमोर, प्रसिध कृष्णा, तनुष कोटियन, नांद्रे बर्गर, कुलदीप सेन, डोनोवन फरेरा, आबिद मुश्ताक, कुणाल सिंग राठौर.
लखनौ सुपर जायंट्स: देवदत्त पडिक्कल, क्विंटन डी कॉक, दीपक हुडा, केएल राहुल (कर्णधार, विकेटकिपर), निकोलस पूरन, मार्कस स्टॉइनिस, कृणाल पंड्या, रवी बिश्नोई, मोहसिन खान, नवीन-उल-हक, शिवम मावी, अमित मिश्रा, शमर जोसेफ, डेव्हिड विली, काइल मेयर्स, ॲश्टन टर्नर, कृष्णप्पा गौथम, प्रेरक मंकड, यश ठाकूर, मणिमरन सिद्धार्थ, आयुष बडोनी, युधवीर सिंग चरक, अर्शद खान, मयंक यादव, अर्शीन कुलकर्णी.