इंडियन प्रीमियर लीग २०२४ चा २४ वा सामना आज (१० एप्रिल) राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात जयपूरमध्ये खेळला गेला. या सामन्यात गुजरातने राजस्थानचा ३ गडी राखून पराभव केला. राशिद खानने शेवटच्या चेंडूवर चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला.
राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना १९६ धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातने ७ गडी गमावून सामना जिंकला. अखेरच्या चेंडूवर संघाने सामना जिंकला. राजस्थानकडून संजू सॅमसनने नाबाद ६८ धावांची खेळी केली. रियान परागने ७६ धावा केल्या. गुजरातकडून उमेश यादव, राशिद खान आणि मोहित शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
गुजरातच्या विजयात राशिद खानने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने ११ चेंडूत २४ नाबाद धावा केल्या. राहुल तेवतियाने २२ धावा केल्या. शुभमन गिलने ७२ धावांची खेळी केली. साई सुदर्शनने ३५ धावा केल्या. राजस्थानकडून गोलंदाजीत कुलदीप सेनने ३ बळी घेतले. युजवेंद्र चहलने २ बळी घेतले. आवेश खानने १ बळी घेतला.
गुजरात टायटन्ससाठी १९ वे षटक खूप चांगले होते. संघाने २० धावा केल्या. राजस्थानसाठी कुलदीप सेनने पहिली ३ओव्हर चांगली केली. पण चौथे षटक महागात पडले. शेवटच्या षटकात गुजरातला विजयासाठी १५ धावांची गरज आहे. राहुल तेवतिया २० धावा करून खेळत आहे. राशिद ९ धावा करून खेळत आहे.
१३३ धावांवर गुजरातला पाचवा धक्का बसला. कर्णधार गिल ७२ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला संजू सॅमसनने यष्टिचित केले. या सामन्यात गिलने ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ७२ धावांची दमदार खेळी केली. शाहरुख खान सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे.
गिलने ३५ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याचे टी-20 कारकिर्दीतील हे २४वे अर्धशतक आहे. सध्या तो ३६ चेंडूत ५१ धावांवर खेळत आहे तर विजय शंकर ९ चेंडूत १६ धावांवर खेळत आहे.
कुलदीप सेनने गुजरातला पहिला धक्का दिला. त्याने पहिल्याच षटकात साई सुदर्शनला एलबीडब्ल्यू आऊट केले. सुदर्शन ३५ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने शुभमन गिलसोबत पहिल्या विकेटसाठी ६४ धावांची भागीदारी केली. मॅथ्यू वेड तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे.
गुजरातच्या डावाचा पॉवरप्ले संपला असून त्यांनी ६ षटकात बिनबाद ४२ धावा केल्या आहेत. गिल आणि सुदर्शन यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे. दोघांनी डावाच्या सहाव्या षटकात १४ धावा केल्या. ही ओव्हर आवेश खानने टाकले.
राजस्थानने २० षटकांत ३ गडी गमावून १९६ धावा केल्या आणि गुजरातसमोर १९७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
या सामन्यात यशस्वी जैस्वाल आणि जोस बटलर यांच्यात पहिल्या विकेटसाठी ३२ धावांची भागीदारी झाली. जैस्वाल ५ चौकारांच्या मदतीने २४ धावा करून बाद झाला, तर गेल्या सामन्यात नाबाद शतक झळकावणाऱ्या बटलरला केवळ ८ धावा करता आल्या. राशिद खानने त्याला आपला शिकार बनवले. या फिरकीपटूने अनुभवी फलंदाजाला टी-20 क्रिकेटमध्ये पाचव्यांदा बाद केले.
यानंतर संजू सॅमसन आणि रियान पराग यांनी डाव सांभाळला. दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी १३० धावांची मोठी भागीदारी झाली.
या सामन्यात दोघांनी अर्धशतके झळकावली. रियानने ३४ चेंडूत ५० धावा पूर्ण केल्या. आयपीएलच्या १७ व्या मोसमातील हे त्याचे तिसरे अर्धशतक आहे. त्याचवेळी कर्णधार संजूने ३१ चेंडूत अर्धशतक झळकावले. आयपीएलच्या या मोसमातील त्याचे कारकिर्दीतील हे तिसरे अर्धशतक आहे. यासह तो राजस्थानसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. दोघांची ही भागीदारी मोहित शर्माने तोडली.
त्याने शेवटच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर रियान परागला बाद केले, त्याने ७६ धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ३ चौकार आणि ५ षटकार आले. शिमरॉन हेटमायर पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येताच त्याने १ चौकार आणि १ षटकार मारला. ५ चेंडूत १३ धावा करून तो नाबाद राहिला. त्याचवेळी संजूने ७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ६८ धावा केल्या. तोही नाबाद राहिला. गुजरातकडून उमेश यादव, रशीद खान आणि मोहित शर्मा यांना प्रत्येकी एक विकेट घेतला.
राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने आयपीएलच्या १७ व्या मोसमातील तिसरे अर्धशतक झळकावले आहे. त्याने ३१ चेंडूत अर्धशतक ठोकले. यासह तो राजस्थानसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. सध्या तो ५२ धावा करून खेळत आहे.
राजस्थानने ४२ धावांवर दोन विकेट गमावल्या होत्या. यानंतर संजू सॅमसन आणि रियान पराग यांनी डाव सांभाळला. दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी झाली आहे. संजू २८ चेंडूत ४६ धावा तर पराग ४२ चेंडूत ६६ धावांवर खेळत आहेत.
उमेश यादवने राजस्थानला पहिला धक्का दिला. त्याने पाचव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर यशस्वी जैस्वालला मॅथ्यू वेडकरवी झेलबाद केले. जैस्वालने १९ चेंडूंत ५ चौकारांच्या मदतीने २४ धावा केल्या. यशस्वी आणि बटलरमध्ये पहिल्या विकेटसाठी ३२ धावांची भागीदारी झाली. संजू सॅमसन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आहे.
नाणेफेक हरल्यानंतर राजस्थान रॉयल्स प्रथम फलंदाजीसाठी सज्ज झाला आहे. जोस बटलर आणि यशस्वी जैस्वाल सलामीसाठी क्रीजवर हजर आहेत. आजच्या सामन्यात या दोघांकडून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा आहे. पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या बिनबाद ६ आहे.
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, नवदीप सैनी, युझवेंद्र चहल.
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, विजय शंकर, अभिनव मनोहर, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), राहुल तेवतिया, रशीद खान, उमेश यादव, स्पेन्सर जॉन्सन, नूर अहमद, मोहित शर्मा.
गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्णधार शुभमन गिलने सांगितले की, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्यात आले आहेत. मॅथ्यू वेडला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले आहे. केन विल्यमसन प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर आहे.तसेच, बीआर शरथच्या जागी अभिनव मनोहर हा सामना खेळत आहे.
जयपूरमध्ये पाऊस थांबला असून मैदानावरून कव्हर काढण्यात आले आहेत. आता नाणेफेक ७:२५ वाजता होईल, पहिला चेंडू ७:४० वाजता टाकला जाईल.
जयपूरमध्ये पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे टॉस विलंबाने होणार आहे. पावसामुळे मैदान झाकण्यात आले आहे.
दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत ५ सामने झाले असून त्यात राजस्थानने एक आणि गुजरातने ४ जिंकले आहेत.
राजस्थानचा फिरकीपटू युजवेंद्र चहलला २०० विकेट्सचा टप्पा गाठण्यापासून आणखी पाच विकेट्सची दूर आहे. गुजरातविरुद्ध चहलने पाच विकेट्स घेतल्यास तो आयपीएलमध्ये २०० विकेट्सचा टप्पा गाठणारा पहिला गोलंदाज ठरेल. आयपीएलमध्ये रविचंद्रन अश्विनला गुजरातचा कर्णधार शुभमन गिलला एकदाही बाद करता आले नाही. शुभमन गिलने अश्विनविरुद्ध ५८ चेंडूत ९५ धावा केल्या आहेत. दुसरीकडे, राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनचे राशिद खानविरुद्ध आकडे चांगले आहेत. त्याने राशीद खानविरुद्ध ९६ चेंडूत १११ धावा केल्या आहेत.
राजस्थान रॉयल्स - संजू सॅमसन (कर्णधार/ विकेटकीपर), यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, नांद्रे बर्गर, युझवेंद्र चहल, शुभम दुबे, रोवमन पॉवेल, तनुष कोटियन, कुलदीप सेन, आबिद मुश्ताक, संदीप शर्मा, नवदीप सैनी, केशव महाराज, टॉम कोहलर-कॅडमोर, डोनोवन फरेरा, कुणाल सिंग राठौर.
गुजरात टायटन्स - शुभमन गिल (कर्णधार), शरथ बीआर (विकेटकीपर), साई सुदर्शन, विजय शंकर, राहुल तेवतिया, रशीद खान, नूर अहमद, उमेश यादव, स्पेन्सर जॉन्सन, दर्शन नळकांडे, मोहित शर्मा, केन विल्यमसन, अभिनव मनोहर, मॅथ्यू, वा. मानव सुथार, जयंत यादव, रिद्धिमान साहा, डेव्हिड मिलर, संदीप वॉरियर, शाहरुख खान, जोशुआ लिटल, आर साई किशोर, कार्तिक त्यागी, अजमतुल्ला ओमरझाई, सुशांत मिश्रा