RR vs GT Live Streaming: गुजरातचा संघ आज बलाढ्य राजस्थानशी भिडणार; कधी, कुठे पाहायचा सामना?
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  RR vs GT Live Streaming: गुजरातचा संघ आज बलाढ्य राजस्थानशी भिडणार; कधी, कुठे पाहायचा सामना?

RR vs GT Live Streaming: गुजरातचा संघ आज बलाढ्य राजस्थानशी भिडणार; कधी, कुठे पाहायचा सामना?

Updated Apr 10, 2024 10:36 AM IST

Rajasthan Royals vs Gujarat Titans Live Streaming: राजस्थान आणि गुजरात यांच्यातील लाइव्ह सामना कधी आणि कुठे पाहता येईल? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात आज क्रिकेटचा थरार पाहायला मिळणार आहे.
राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात आज क्रिकेटचा थरार पाहायला मिळणार आहे.

IPL 2024: आयपीएल २०२४ चा २४ वा सामना आज (१० एप्रिल) राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. हा सामना राजस्थान रॉयल्सचे होम ग्राऊंड जयपूर येथील सवाई मानसिंह स्टेडियमवर खेळला जाणार आहे. संजू सॅमसंनच्या नेतृत्वाखाली राजस्थानच्या संघाने आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेत गुजरातच्या संघाने आतापर्यंत एकही सामना गमावला नाही. यामुळे गुजरातसमोर राजस्थानचे मोठे आव्हान असेल. दोन युवा कर्णधार आमने सामने येणार असल्याने हा सामना अत्यंत रोमहर्षक होण्याची शक्यता आहे.

कधी, कुठे पाहणार सामना?

राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात मंगळवारी (१० एप्रिल २०२४) आयपीएलमधील २४वा सामना खेळला जाईल. हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, राजस्थान आणि गुजरात यांच्यातील सामना सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होईल. यापूर्वी अर्धातास नाणेफेक होईल. हा सामना स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर हिंदी आणि इंग्रजीसह देशातील इतर भाषांमध्ये पाहू शकतो. जिओ सिनेमा ॲपवर या सामन्याचे लाईव्ह-स्ट्रीमिंग पाहता येईल. याशिवाय, https://marathi.hindustantimes.com वर सामन्याशी संबंधित बातम्या, लाइव्ह अपडेट्स आणि रेकॉर्डही वाचू शकता.

शशांक-आशुतोषने शेवटच्या षटकात २६ धावा ठोकल्या, तरीही पंजाबचा पराभव, हैदराबाद २ धावांनी विजयी

गुजरात टायटन्स संघ:

शुभमन गिल (कर्णधार), साई सुधारसन, शरथ बीआर (विकेटकिपर), विजय शंकर, राहुल तेवतिया, रशीद खान, नूर अहमद, उमेश यादव, स्पेन्सर जॉन्सन, दर्शन नळकांडे, मोहित शर्मा, केन विल्यमसन, अभिनव मनोहर, मॅथ्यू वेड, मानव सुथार, जयंत यादव, रिद्धिमान साहा, डेव्हिड मिलर, संदीप वॉरियर, शाहरुख खान, जोशुआ लिटल, रविश्रीनिवासन साई किशोर, कार्तिक त्यागी, अजमतुल्ला उमरझाई, सुशांत मिश्रा

Dhoni-Gambhir Video : धोनी आणि गौतम गंभीरने मारली एकमेकांना मिठी, सोशल मीडियावर आनंदोत्सव

राजस्थान रॉयल्स संघ:

यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार, विकेटकिपर), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, नांद्रे बर्गर, युझवेंद्र चहल, शुभम दुबे, रोवमन पॉवेल, तनुष पॉवेल , कुलदीप सेन, आबिद मुश्ताक, संदीप शर्मा, नवदीप सैनी, केशव महाराज, टॉम कोहलर-कॅडमोर, डोनोवन फरेरा, कुणाल सिंग राठौर

ओए चुना लगा दिया... २५ कोटी पाण्यात! अवघ्या ४ सामन्यात मिचेल स्टार्कला दुखापत, किती सामन्यांना मुकणार?

आयपीएलची तिकिटे कुठे खरेदी करता येतील

पेटीएम अॅप किंवा https://insider.in/online वर जाऊन आयपीएल सामन्याचे तिकिटे खरेदी करू शकता. आयपीएल २०२४ च्या तिकिटांची किंमत १२०० हजार ते १०००० रुपयांपर्यंत आहे. महत्त्वाचे म्हणजे, अधिकृत वेबसाईटवरूनच तिकीट खरेदी करा.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग