मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  RR vs GT Dream 11 Team Prediction : आज ड्रीम इलेव्हनवर या खेळाडूंना करा कर्णधार-उपकर्णधार, मालामाल व्हाल!

RR vs GT Dream 11 Team Prediction : आज ड्रीम इलेव्हनवर या खेळाडूंना करा कर्णधार-उपकर्णधार, मालामाल व्हाल!

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Apr 10, 2024 11:24 AM IST

RR vs GT Dream 11 Team : आयपीएल २०२४ मध्ये आज राजस्थान आणि गुजरात आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघांमधील हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे.

RR vs GT Dream 11 Team Prediction आज ड्रीम इलेव्हनवर या खेळाडूंना करा कर्णधार-उपकर्णधार, मालामाल व्हाल!
RR vs GT Dream 11 Team Prediction आज ड्रीम इलेव्हनवर या खेळाडूंना करा कर्णधार-उपकर्णधार, मालामाल व्हाल! (PTI)

आयपीएल २०२४ मध्ये आज (१० एप्रिल) राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स (RR vs GT) आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघांमधील हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

राजस्थानने गेल्या सामन्यात आरसीबीचा पराभव केला होता. त्याचवेळी गुजरातला त्यांच्या गेल्या सामन्यात पंजाब किंग्जकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. 

दरम्यान, राजस्थान असो की गुजरात, दोन्ही संघांकडे तगड्या खेळाडूंची फौज आहे. अशा परिस्थितीत या सामन्यासाठी ड्रीम-इलेव्हन (Dream 11 todays match team prediction) निवडणे निश्चितच खूप कठीण काम असेल, पण येथे आम्ही तुमची काही प्रमाणात मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोण असेल सर्वोत्तम यष्टिरक्षक?

यष्टिरक्षक म्हणून जोस बटलर आणि संजू सॅमसन हे दोन सर्वोत्तम पर्याय असतील. बटलर फॉर्ममध्ये परतला असून त्याने आरसीबीविरुद्ध शतक झळकावले आहे. त्याचबरोबर संजू सॅमसनची बॅटही या मोसमात आतापर्यंत चांगलीच बोलली आहे.

फलंदाज

शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल आणि साई सुदर्शन हे फलंदाजीत सर्वोत्तम पर्याय असतील. आयपीएल २०२४ मध्ये गिलच्या बॅटने तितकी चांगली कामगिरी केली नाही, पण मोठी खेळी खेळण्याची ताकद त्याच्याकडे आहे. त्याच वेळी, यशस्वी तुम्हाला त्याच्या घरच्या मैदानावर भरपूर गुण मिळवून देऊ शकतो.

हे अष्टपैलू प्रभावी ठरतील

आर अश्विन आणि रियान पराग हे अष्टपैलू म्हणून सर्वोत्तम पर्याय असतील. आयपीएल २०२४ मध्ये रियानने चांगली कामगिरी केली आहे. तर अश्विन फिरकीसोबत बॅटनेही चमत्कार करू शकतो.

गोलंदाज

गोलंदाजांमध्ये ट्रेंट बोल्ट आणि युझवेंद्र चहल यांना वगळण्याची चूक तुम्ही कधीही करू शकत नाही. बोल्ट सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये विकेट घेत असतो, तर चहल डेथ ओव्हर्समध्ये विकेट मिळवून देतो. रशीद खान गुजरातसाठी तुमचा ट्रम्प कार्ड ठरू शकतो. तसेच, राजस्थानचा नांद्रे बर्गरदेखील तुम्हाला अनेक पॉइंट्स मिळवून देऊ शकतो. 

RR vs GT Dream 11 Team Prediction

यष्टिरक्षक - जोस बटलर (कर्णधार), संजू सॅमसन

फलंदाज - शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, साई सुदर्शन

अष्टपैलू - आर अश्विन, रियान पराग (उपकर्णधार)

गोलंदाज - ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, राशिद खान, नांद्रे बर्गर.

IPL_Entry_Point