RR vs DC Indian Premier League 2024 : आयपीएल २०२४ चा नववा सामना आज (२८ मार्च) राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जात आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग क्रिकेट स्टेडियमवर दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर राजस्थानने निर्धारित २० षटकात ५ बाद १८५ धावा केल्या आहेत. दिल्लीला विजयासाठी १८६ धावा कराव्या लागणार आहेत.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थान संघाची सुरुवात खूपच खराब झाली. संघाने केवळ ३६ धावांत ३ विकेट गमावल्या होत्या. यशस्वी जैस्वाल (५), कर्णधार संजू सॅमसन (१५) आणि जोस बटलर (११) लवकर बाद झाले. यानंतर रियान पराग आणि आर अश्विन (२९) यांनी डाव सांभाळला. दोघांमध्ये ३७ चेंडूत ५४ धावांची भागीदारी झाली.
परागने ३४ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. तसेच ध्रुव जुरेल (२०) सोबत २३ चेंडूत ५२ धावांची भागीदारी केली. शेवटी परागने ४५ चेंडूत नाबाद ८४ धावांची सर्वोच्च खेळी खेळली.
परागसह शिमरॉन हेटमायरने १६ चेंडूत ४३ धावा जोडल्या. अशा प्रकारे राजस्थानची धावसंख्या ५ गड्यांच्या मोबदल्यात १८५ धावांपर्यंत पोहोचली. दिल्ली संघाकडून खलील अहमद, कुलदीप यादव, अक्षर पटेल, एनरिक नॉर्खिया आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.
दिल्ली कॅपिटल्स: डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, रिकी भुई, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, खलील अहमद, मुकेश कुमार.
इम्पॅक्ट सब: अभिषेक पोरेल, जेक फ्रेझर-मॅकगुर्क, प्रवीण दुबे, कुमार कुशगरा, रसिक दार.
राजस्थान रॉयल्स: यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा, आवेश खान.
इम्पॅक्ट सब: रोवमन पॉवेल, नांद्रे बर्जर, तनुष कोटियन, शुभम दुबे, कुलदीप सेन.
संबंधित बातम्या