मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  RR Vs DC Live Streaming: फुकटात बघा दिल्ली- राजस्थान यांच्यातील सामना; कधी, कुठे आणि कसे? वाचा

RR Vs DC Live Streaming: फुकटात बघा दिल्ली- राजस्थान यांच्यातील सामना; कधी, कुठे आणि कसे? वाचा

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 28, 2024 10:50 AM IST

Rajasthan Royals vs Delhi Capitals Live Streaming: राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज आयपीएल २०२४ मधील नववा सामना खेळला जाणार आहे.

राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज लढत पाहायला मिळणार आहे.
राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज लढत पाहायला मिळणार आहे.

IPL 2024: आयपीएल २०२४ च्या नवव्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना खेळला जाणार आहे. राजस्थान आणि दिल्ली यांच्यात अनेकदा चुरशीची लढत पाहायला मिळाली. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण २७ सामने खेळले गेले. यापैकी दिल्लीनं १३ आणि राजस्थानने १४ सामने जिंकले.दिल्लीने आयपीएल २०२४ च्या या हंगामाची सुरुवात पराभवाने केली. तर, राजस्थानने त्यांचा पहिला सामना जिंकला.

जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर या दोन्ही संघ आतापर्यंत सहावेळा एकमेकांसमोर आले. या मैदानात राजस्थानचा दबदबा पाहायला मिळत आहे. या मैदानावर राजस्थानने राजस्थानविरुद्ध ४- २ अशा फरकाने विजय मिळवला आहे.

SRH vs MI Highlights : आयपीएलचा ऐतिहासिक सामना... हैदराबादने सर्वात मोठी धावसंख्या उभारून मुंबईला हरवलं

कधी, कुठे पाहायचा सामना?

आयपीएल २०२४ च्या नवव्या सामन्यात दिल्ली- राजस्थान कमेकांशी भिडणार आहेत. हा सामना २८ मार्च २०२४ रोजी होणार आहे. जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवरहा सामना खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी ७.३० वाजता या सामन्याला सुरुवात होईल. यापूर्वी अर्धातास म्हणजेच ७ वाजता नाणेफेक होईल. स्टार स्पोर्ट्स १ एचडीवर या सामन्याचे लाईव्ह टेलिकास्ट केले जाईल. तर, जिओ सिनेमावर ग्राहकांना फुकटात लाईव्ह स्ट्रिमिंगचा आनंद लुटता येणार आहे.

राजस्थानचा संभाव्य संघ-

यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल/नांद्रे बर्गर, आर अश्विन, आवेश खान, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.

दिल्लीचा संभाव्य संघ-

डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, अभिषेक पोरेल, रिकी भुई, ऋषभ पंत, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार/कुमार कुशाग्रा, एनरिक नॉर्खिया, कुलदीप यादव खलील अहमद इशांत शर्मा

IPL_Entry_Point