RR Vs DC : राजस्थानची प्रथम फलंदाजी; दिल्लीच्या संघात मोठे बदल, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  RR Vs DC : राजस्थानची प्रथम फलंदाजी; दिल्लीच्या संघात मोठे बदल, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

RR Vs DC : राजस्थानची प्रथम फलंदाजी; दिल्लीच्या संघात मोठे बदल, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

Mar 28, 2024 07:18 PM IST

RR Vs DC IPL 2024 Toss Update : आयपीएल २०२४ चा नववा सामना राजस्थान आणि दिल्लील यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघ जयपूरच्या सवाई मानसिंग क्रिकेट स्टेडियमवर आमनेसामने आहेत.

RR Vs DC IPL 2024 Toss Update
RR Vs DC IPL 2024 Toss Update

RR Vs DC Playing 11, IPL 2024 आयपीएल २०२४ चा नववा सामना आज (२८ मार्च) राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जात आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग क्रिकेट स्टेडियमवर दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. आता राजस्थान प्रथम फलंदाजी करणार आहे.

दिल्लीच्या संघात दोन बदल झाले आहेत. दुखापतीमुळे इशांत शर्मा या सामन्यात दिसणार नाही. त्याचवेळी शाई होपला पाठीची समस्या आहे. या दोघांच्या जागी मुकेश कुमार आणि ॲनरिक नॉर्खिया हा सामना खेळणार आहेत. तर, राजस्थान रॉयल्सने संघात कोणताही बदल केलेला नाही.

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

दिल्ली कॅपिटल्स: डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, रिकी भुई, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, खलील अहमद, मुकेश कुमार.

इम्पॅक्ट सब: अभिषेक पोरेल, जेक फ्रेझर-मॅकगुर्क, प्रवीण दुबे, कुमार कुशगरा, रसिक दार.

राजस्थान रॉयल्स: यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा, आवेश खान.

इम्पॅक्ट सब: रोवमन पॉवेल, नांद्रे बर्जर, तनुष कोटियन, शुभम दुबे, कुलदीप सेन.

दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स हेड टू हेड

दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएलमध्ये आतापर्यंत २७ सामने खेळले गेले आहेत. यापैकी राजस्थानने १४ सामने जिंकले असून दिल्लीने १३ सामने जिंकले आहेत. याबाबतीत सॅमसनच्या संघाचा वरचष्मा आहे. राजस्थानविरुद्ध दिल्लीची सर्वोच्च धावसंख्या २०७ धावा आहे तर सॅमसनच्या संघाने दिल्लीविरुद्ध २२२ धावा केल्या आहेत.

Whats_app_banner