आयपीएल २०२४ मधील नववा सामना आज (२८ मार्च) राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. राजस्थानने आपला पहिला सामना जिंकला होता, तर दिल्ली कॅपिटल्सला पहिल्याच सामन्यात पंजाब किंग्जकडून पराभव स्वीकारावा लागला होता. आता दिल्ली कॅपिटल्सला या स्पर्धेतील पहिल्या विजयाचे वेध लागले आहेत.
राजस्थान आणि दिल्ली यांच्यातील सामना संध्याकाळी ७:३० वाजेपासून जयपूरच्या सवाई मानसिंग क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.
राजस्थान असो की दिल्ली , दोन्ही संघांकडे तगड्या खेळाडूंची फौज आहे. अशा परिस्थितीत या सामन्यासाठी ड्रीम-इलेव्हनसाठी (Dream 11 todays match taam prediction) संघ निवडणे निश्चितच खूप कठीण काम असेल. पण येथे आम्ही तुमची काही प्रमाणात मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत.
जर तुम्हाला आयपीएलदरम्यान फँटसी क्रिकेट खेळण्याची आवड असेल तर तुम्ही आजच्या सामन्यासाठीचा संघ अशाप्रकारे बनवू शकता.
फलंदाजांमध्ये तुम्ही डेव्हिड वॉर्नरला दिल्ली कॅपिटल्समधून निवडू शकता, तर राजस्थान रॉयल्समधून यशस्वी जैस्वाल आणि रियान पराग यांना निवडता येईल. या सर्व फलंदाजांनी गेल्या सामन्यात चांगली फलंदाजी केली होती. तुमच्या ड्रीम इलेव्हनमध्ये या खेळाडूंचा समावेश करून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता.
गोलंदाजांमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खलील अहमद, कुलदीप यादव तर राजस्थानकडून ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल यांचा समावेश करू शकता. या खेळाडूंकडून गेस्या सामन्यात चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती.
यष्टिरक्षक म्हणून तुम्ही राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन आणि दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत यांचा तुमच्या संघात समावेश करू शकता. संजू सॅमसनने गेल्या सामन्यात शानदार फलंदाजी केली होती. त्या सामन्यात संजूच्या बॅटमधून ८२ धावा आल्या होत्या.
अष्टपैलू म्हणून तुम्ही तुमच्या ड्रीम इलेव्हन संघात मिचेल मार्श आणि अक्षर पटेल यांचा समावेश करू शकता.
या सामन्यासाठी तुम्ही कर्णधार यशस्वी जैस्वाल आणि उपकर्णधार मिचेल मार्शला बनवू शकता. मिचेल मार्शने गेल्या सामन्यात चांगली कामगिरी करत संघाला वेगवान सुरुवात करून दिली होती.
यष्टिरक्षक- संजू सॅमसन, ऋषभ पंत
फलंदाज- डेव्हिड वॉर्नर, रियान पराग, यशस्वी जैस्वाल (कर्णधार)
अष्टपैलू - मिचेल मार्श (उपकर्णधार), अक्षर पटेल
गोलंदाज - खलील अहमद, कुलदीप यादव, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल.
संबंधित बातम्या