RCB vs KKR Match Ticket Online : आयपीएल २०२५ चा मोसम शनिवारी (२२ मार्च) सुरू होत आहे. या मोसमातील पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ आमनेसामने येणार आहेत. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर उभय संघांमधील हा सामना होणार आहे.
या सामन्यासाठीची तिकिट बुकींग सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, BookMyShow नुसार, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि कोलकाता नाइट रायडर्स सामन्याची सर्व तिकिटे विकली गेली आहेत.
या हंगामातील पहिल्या सामन्याच्या तिकिटांची किंमत ९०० रुपयांपासून १५ हजार रुपयांपर्यंत होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स सामन्याच्या तिकिटांना मोठी मागणी होती. त्यामुळे या सामन्याची तिकिटे संपायला जास्त वेळ लागला नाही.
पण तुम्हाला या सामन्याचे तिकीट हवे असेल तर? दरम्यान, BookMyShow वर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स सामन्यापूर्वी तिकीट विंडो उघडू शकते. असे झाल्यास तुम्ही तिकीट खरेदी करू शकता.
त्याच वेळी, या सामन्याआधी एक रंगतदार उद्घाटन सोहळा होईल. या उद्घाटन सोहळ्यात मोठे प्रसिद्ध चेहरे दिसणार आहेत. बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानी व्यतिरिक्त गायिका श्रेया घोषाल आणि अरिजित सिंग सारखे प्रसिद्ध चेहरे आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात दिसणार आहेत.
क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे अध्यक्ष स्नेहशिष गांगुली म्हणाले, “तिकीटांना जास्त मागणी असलेला हा मार्की सामना आहे. ईडन गार्डन्स प्रदीर्घ कालावधीनंतर उद्घाटन समारंभ आयोजित करण्यासाठी सज्ज आहे.
संबंधित बातम्या