RCB vs UPW Women’s Premier League 2024 : महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सामन्यात आज (२४ फेब्रुवारी) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अवघ्या २ धावांनी थरारक विजय मिळवला. युपी वॉरियर्सला शेवटच्या षटकात विजयासाठी ११ धावांची गरज होती.
दीप्ती शर्मा आणि सोफी एक्लस्टोन फलंदाजीला होत्या. पण या दोघींना या षटकात केवळ ९ धावाच करता आल्या. आरसीबीसाठी शेवटचे षटक फिरकी गोलंदाज सोफी मोलिनक्स हिने टाकले.
पण आरसीबीच्या विजयाची खरी नायिका शोभना आशा ठरली. शोभना आशा हिने सामन्यात ५ विकेट घेतल्या. तिने ४ षटकात २२ धावा देत युपीच्या सर्वच महत्वाच्या फलंदाजांना तंबूत पाठवले.
यासह शोभन आशा ही डब्ल्यूपीएलच्या दुसऱ्या सत्रात ५ बळी घेणारी पहिली भारतीय गोलंदाज ठरली आहे.
१५८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यूपीच्या संघाला २० षटकांत ७ बाद १५५ धावा करता आल्या. युपीकडून ग्रेस हॅरिस ३८ आणि श्वेता सेहरावत हिने ३१ धावांचे योगदान दिले. बाकीचे फलंदाज विशेष काही करू शकले नाही.
तत्पूर्वी, आरसीबीने सामन्यात युपीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ बाद १५७ धावा केल्या. त्यांच्याकडून सबिनेनी मेघना आणि ऋचा घोष यांनी अर्धशतकी खेळी खेळली. दोघींनी अनुक्रमे ५३ आणि ६२ धावा केल्या.
तर कर्णधार केवळ स्मृती मानधना १३ धावा करण्यात यशस्वी ठरली. याशिवाय आरसीबीची एकही फलंदाज जास्त काळ विकेटवर टिकू शकली नाही. सोफी डिव्हाईनला १ धाव करता आली, तर ॲलिस पॅरीला ८ धावा करता आल्या. सोफी मॉलिनेक्स ९ धावांवर नाबाद राहिली आणि श्रेयंका पाटील ८ धावांवर नाबाद राहिली.
यूपीकडून राजेश्वरी गायकवाडने दोन फलंदाज बाद केले. तर दीप्ती, एक्लेस्टोन, मॅकग्रा आणि हॅरिस यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
संबंधित बातम्या