Rovman Powell Six Video : रोव्हमन पॉवेलने मारला सर्वात लांब षटकार, चेंडू स्टेडियमच्या बाहेर, व्हिडीओ पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Rovman Powell Six Video : रोव्हमन पॉवेलने मारला सर्वात लांब षटकार, चेंडू स्टेडियमच्या बाहेर, व्हिडीओ पाहा

Rovman Powell Six Video : रोव्हमन पॉवेलने मारला सर्वात लांब षटकार, चेंडू स्टेडियमच्या बाहेर, व्हिडीओ पाहा

Updated Jun 09, 2024 04:57 PM IST

Rovman Powell Hit 107 Meter Longest Six : वेस्ट इंडिजने हा सामना जिंकून इतिहास रचला, पण कर्णधार रोव्हमन पॉवेलनेही आपल्या नावावर अनोखा विक्रम नोंदवला आहे. वास्तविक, रोवमन पॉवेलने युगांडाविरुद्ध १०७ मीटर लांब षटकार मारला जो स्टेडियमच्या बाहेर जाऊन पडला.

Rovman Powell Six Video : रोव्हमन पॉवेलने मारला सर्वात लांब षटकार, चेंडू स्टेडियमच्या बाहेर, व्हिडीओ पाहा
Rovman Powell Six Video : रोव्हमन पॉवेलने मारला सर्वात लांब षटकार, चेंडू स्टेडियमच्या बाहेर, व्हिडीओ पाहा

Rovman Powell 107 meter Six Video : टी-20 विश्वचषक २०२४ मध्ये १८वा सामना वेस्ट इंडिज आणि युगांडा यांच्यात झाला. या सामन्यात कॅरेबियन संघाने युगांडाचा १३४ धावांनी पराभव करून टी-20 मधील सर्वात मोठा विजय नोंदवला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने २० षटकांत १७३ धावा केल्या. प्रत्युत्तरात युगांडाचा संपूर्ण संघ १२ षटकांत अवघ्या ३९ धावांत गारद झाला.

वेस्ट इंडिजने हा सामना जिंकून इतिहास रचला, पण कर्णधार रोव्हमन पॉवेलनेही आपल्या नावावर अनोखा विक्रम नोंदवला आहे.

वास्तविक, रोवमन पॉवेलने युगांडाविरुद्ध १०७ मीटर लांब षटकार मारला जो स्टेडियमच्या बाहेर जाऊन पडला. सध्याच्या T20 विश्वचषकातील हा सर्वात लांब षटकार आहे. पॉवेलने सामन्याच्या ११ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर हा षटकार ठोकला.

रोव्हमन पॉवेलने २३ धावा केल्या

गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात रोव्हमन पॉवेलने संथ विकेटवर १८ चेंडूत २३ धावा केल्या. वेस्ट इंडिजच्या कर्णधाराने आपल्या छोट्या खेळीत १ चौकार आणि १ षटकार मारला. युगांडाचा गोलंदाज मसाबाने त्याची शिकार केली.

रसेलचा पॉवर हिटिंग शो

शेवटच्या षटकांमध्ये फलंदाजीला आलेल्या आंद्रे रसेलने तुफानी फलंदाजी केली. रसेलने १६ चेंडूंत ६ चौकारांच्या मदतीने नाबाद ३० धावांची जलद खेळी खेळली. चार्ल्सने सर्वाधिक ४४ धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून अकील हुसेनने ११ धावांत ५ बळी घेतले.

युगांडाने केली सर्वात लहान धावसंख्या

युगांडाने केलेली ३९ धावांची ही धावसंख्या टी-20 विश्वचषकातील सर्वात लहान धावसंख्या आहे. फिरकीपटू अकिल हुसेनने सर्वाधिक ५ बळी घेत युगांडाच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. युगांडाने हा सामना १३४ धावांनी हरला. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने २० षटकात ५ बाद १७३ धावा केल्या होत्या.

Whats_app_banner

संबंधित बातम्या