rohit sharma stats in t20 cricket : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने या वर्षी जूनमध्ये होणारा टी-20 वर्ल्डकप खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. रोहित शर्माने त्याचा शेवटचा टी-20 सामना २०२२ च्या टी-20 वर्ल्डकपमध्ये खेळला होता. इंग्लंडविरुद्धच्या त्या सेमी फायनलमध्ये भारताचा पराभव झाला होता.
अशा परिस्थितीत रोहितला फिटनेस आणि आयपीएलमधील कामगिरीच्या आधारवर वर्ल्डकप टीममध्ये जागा मिळते की, तो थेट वर्ल्डकप संघात एन्ट्री मिळवतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
पण रोहित शर्माचे गेल्या ५ वर्षांतील टी-20 क्रिकेटमधील आकडे पाहिले तर तुम्हाला धक्का बसेल आणि तुम्हीच म्हणाल की रोहितने टी-20 वर्ल्डकप न खेळलेलाच बरा.
रोहित शर्मा हा त्याच्या हार्ड हिटिंगसाठी ओळखला जातो. २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात रोहितने अप्रतिम फॉर्म दाखवला. त्याप्रमाणे तो आगामी टी-20 विश्वचषकातही कमाल करू शकतो. पण गेल्या ५ वर्षात रोहित शर्माचे टी-20 चे आकडे खूपच खराब आहेत आणि ही खरोखरच चिंतेची बाब आहे.
गेल्या ५ वर्षात रोहित शर्माइतकी खराब सरासरी कोणत्याही फलंदाजाची नसेल. रोहितने गेल्या ५ वर्षांत टी-20 चे १२८ डाव खेळले आणि यात त्याने २६.८८ च्या सरासरीने आणि १३३.६२ च्या स्ट्राइक रेटने ३३३४ धावा केल्या आहेत.
रोहित शर्माने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत १४८ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने यातील १४० डावात फलंदाजी करताना ३१.३२ च्या सरासरीने आणि १३९.२४ च्या स्ट्राईक रेटने ३८५३ धावा केल्या आहेत. यात ४ शतके आणि २९ अर्धशतके असून सर्वोच्च धावसंख्या ११८ आहे.
संबंधित बातम्या