एकीकडे टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चार टी-20 सामन्यांची मालिका खेळत असून, त्यातील तिसरा सामना आज (बुधवारी) होणार आहे. दुसरीकडे टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला पोहोचली आहे. भारतीय संघ २२ नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. पण संघाचा कर्णधार रोहित शर्मा अद्याप टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलियाला गेलेला नाही.
यापूर्वी अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की रोहित शर्मा २२ नोव्हेंबरपासून पर्थमध्ये होणारी पहिली कसोटी खेळू शकणार नाही. मात्र, यामागचे कारण उघड झाले नाही. वैयक्तिक कारणांमुळे रोहित शर्मा संघासह ऑस्ट्रेलियाला गेला नसून तो पहिली कसोटी खेळणार नसल्याचे वृत्त आहे.
आता आणखी एक बातमी आली आहे की, रोहित शर्मा केवळ पर्थ कसोटीच नाही तर ऑस्ट्रेलियाविरुद्धची ॲडलेड कसोटीही खेळू शकणार नाही. रिपोर्टनुसार, रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीत टीम इंडियाचा भाग असणार नाही.
खरंतर रोहित पुन्हा एकदा बाप होणार आहे. पुढील आठवड्यात रोहित बाप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या कारणास्तव, त्याला आपल्या कुटुंबासाठी वेळ द्यायचा आहे आणि त्याने बीसीसीआयकडून सुट्टी घेतली आहे.
ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने सांहितले कीस रोहितच्या अनुपस्थितीत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह संघाचे नेतृत्व करणार आहे. बुमराह कसोटी संघाचा उपकर्णधार आहे. अशा परिस्थितीत, नियमित कर्णधाराच्या अनुपस्थितीत, उपकर्णधार संघाचे नेतृत्व करतो.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन - केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह (कर्णधार) आणि प्रसिद्ध कृष्णा.