Rohit Sharma Ritika Sajdeh PR Stunt : नुकत्याच झालेल्या सिडनी कसोटीत रोहित शर्मा खेळला नाही. त्याला या कसोटीतून वगळण्यात आले. यानंतर रोहित शर्माने चालू सामन्यादरम्यान एक मुलाखत दिली. यानंतर सोशल मीडियवर रोहित शर्माच्या समर्थनार्थ ट्वीटचा महापूर आला. ट्वीट करणाऱ्या लोकांमध्ये काही बॉलीवूड सेलिब्रेटीदेखील होते.
विशेष म्हणजे, त्यांचे ट्वीट हे एकसारखेच होते. यानंतर चाहत्यांच्या लक्षात आले की, हा सगळा प्रकार एक पीआर स्टंट आहे. यानंतर सोशल मीडियावरील एक मोठा वर्ग हिटमॅनची पत्नी रितिका सजदेहकडे संशयाने पाहू लागला.
सिडनी कसोटीतून वगळलेल्या रोहितची इमेज सुधारण्यासाठी आणि त्याच्या खराब कामगिरीवरील लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी रितिकाने पीआर स्टंट केल्याचा आरोप करण्यात आला.
यासाठी रितिकाने विद्या बालनसारख्या स्टार्सची मदत घेतली किंवा तिच्या सांगण्यावरून बॉलीवूड सेलिब्रेटींनी रोहितसाठी पोस्ट केल्याचा आरोप आहे. रितिका सजदेह ही पीआर व्यवसायातील तज्ञ आहे. अशा स्थितीत रितिका सोशल मीडिया युजर्सच्या निशाण्यावर आली.
रितिका सजदेह हिच्यावरील आरोप किती खरे आहेत हे सांगणे कठीण आहे, कारण भारतात क्रिकेटला धर्माचा दर्जा आहे. क्रिकेटपटूंसाठी लोक वेडे आहेत. उदाहरणार्थ, जेव्हा संजू सॅमसनला संधी मिळत नाही, तेव्हा काँग्रेस नेते शशी थरूर यांनी अनेकदा ट्विट करून निवड प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केल्याचे आपण पाहिले आहे.
त्याचप्रमाणे, जर एखाद्या सेलिब्रिटीने रोहितच्या बाजूने पोस्ट केली तर ती प्रमोशनल पोस्ट असेलच असे नाही. रितिका सजदेह PR व्यवसायात किती निष्णात आहे आणि तिचे क्लाइंट कोण कोण आहेत, तसेच तिची नेट वर्थ किती आहे हे आपण येथे जाणून घेऊया.
पती रोहित शर्मा शेकडो कोटींचा मालक आहे, तर रितिका देखील एक यशस्वी बिझनेसवुमन आहे. रोहित शर्मासोबत लग्न होण्यापूर्वीच ती बॉलिवूड आणि क्रिकेटवर्तुळात प्रसिद्ध होती. ती अनेक मोठ्या सेलिब्रेटींची मॅनेजर राहिली आहे.
विशेष म्हणजे, रोहितसह विराट कोहली हा देखील तिचा क्लाइंट होता. फायनान्शिअल एक्स्प्रेसच्या अहवालानुसार रितिकाची एकूण संपत्ती १० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
रितिका सजदेह हे मॅनेजमेंटच्या प्रोफेशनमधील मोठे नाव आहे. स्पोर्ट्स मॅनेजर म्हणून, रितिकाने तिचा चुलत भाऊ बंटी सजदेहच्या स्पोर्ट्स आणि टॅलेंट मॅनेजमेंट फर्म कॉर्नरस्टोनमध्ये सामील होऊन विराट कोहलीला अनेक आकर्षक एंडोर्समेंट डील मिळवून दिल्या आहेत. विराट कोहलीला एंडोर्समेंट्सच्या जगात अव्वल स्थानावर नेण्यात रितिकाचे मोठे योगदान आहे.
बंटी आणि रितिका सजदेह यांनी २०२० मध्ये करन जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या सहकार्याने धर्म कॉर्नरस्टोन एजन्सीची (DCA) स्थापना केली आणि बॉलीवडू विश्वात एन्ट्री केली. ही कंपनी अनेक बॉलीवडू स्टार्सचे काम पाहते. यामध्ये जान्हवी कपूर, सारा अली खान, अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा व्यतिरिक्त, वरूण धवन आणि विद्या बालनसह अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे.
संबंधित बातम्या