मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  मुंबई इंडियन्समध्ये रोहितवर अन्याय? रितिकाच्या त्या कमेंटमुळे वातावरण तापलं

मुंबई इंडियन्समध्ये रोहितवर अन्याय? रितिकाच्या त्या कमेंटमुळे वातावरण तापलं

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Feb 06, 2024 03:02 PM IST

Rohit Sharma Mumbai Indians Captaincy : मुंबई इंडियन्सला ५ आयपीएल जेतेपदं मिळवून देणारा रोहित शर्मा आगामी आयपीएलमध्ये एक खेळाडू म्हणून खेळणार आहे. तर हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करेल. ही गोष्ट चाहत्यांना आवडली नाही.

Rohit Sharma Mumbai Indians Captaincy
Rohit Sharma Mumbai Indians Captaincy

Rohit Sharma Hardik Pandya Captaincy : sमुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाचा वाद शमत नाहीये. आयपीएलच्या मिनी ऑक्शननंतर मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला संघाचा कर्णधार बनवले. यानंतर रोहित शर्माच्या चाहत्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आणि मोठा वाद निर्माण झाला.

मुंबई इंडियन्सला ५ आयपीएल जेतेपदं मिळवून देणारा रोहित शर्मा आगामी आयपीएलमध्ये एक खेळाडू म्हणून खेळणार आहे. तर हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करेल. ही गोष्ट चाहत्यांना आवडली नाही.

पण आता या विषयावर मुंबई इंडियन्सचा हेड कोच मार्क बाउचर याने आपली प्रतिक्रिया दिली आणि रोहितला कर्णधार पदावरून का काढण्यात आले, याचा खुलासा केला. पण या खुलाशावर रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह हिनेही प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्मा यांच्यात सर्वकाही ठीक नाही, असे बोलले जात आहे.

रोहित शर्माकडून कर्णधारपद का हिसकावले?

रोहितला कर्णधार पदावरून का काढण्यात आले, याबाबत मार्क बाउचर म्हणाला की, हा निर्णय पूर्णपणे चांगल्या क्रिकेटसाठी होता, कारण संघ बदलाच्या काळात आहे.

स्मॅश स्पोर्ट्स पॉडकास्टवर बोलताना बाउचर म्हणाला, की मला वाटते की हा निर्णय पूर्णपणे क्रिकेटबद्दल होता. हार्दिकला खेळाडू म्हणून परत आणण्यासाठी आम्ही विंडो पीरियडची वाट पाहत होतो. तसेच, भारतात लोक खूप भावनिक होतात. पण भावनिक होऊन चालत नाही. हा निर्णय फक्त क्रिकेटशी संबंधित आहे. तसेच, यामुळे एक व्यक्ती आणि खेळाडू म्हणून रोहितमधील सर्वोत्तम गोष्टी समोर येतील'.

Mark boucher interview post
Mark boucher interview post (social media)

दरम्यान, मार्क बाउचरची ही मुलाखत व्हायरल झाल्यानंतर रोहित शर्माची पत्नी रितिका हिने या व्हिडीओखाली कमेंट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

रितिका काय म्हणाली?

मार्क बाउचरच्या मुलाखतीच्या पोस्टवर कमेंट करताना रितिकाने लिहिले की, 'यात अनेक गोष्टी चुकीच्या आहेत'.

रोहित आणि मुंबई इंडियन्समध्ये सर्व काही ठीक नाही

दरम्यान, मुंबई इंडियन्सने हार्दिकला कर्णधार बनवल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांनीही त्यांच्या इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केली होती. परंतु त्या इन्स्टा स्टोरीमधून काहीही स्पष्ट होऊ शकले नाही.

पण नंतर, लवकरच मुंबई इंडियन्सनेच अप्रत्यक्षपणे स्पष्ट केले होते, की खेळाडू आणि संघामध्ये सर्व काही ठीक आहे. तेव्हापासून या प्रकरणाबाबत अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.

परंतु आता रितिकाच्या या कमेंटमुळे रोहित आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सर्व काही ठीक नाही हे दिसून येत आहे आणि आयपीएल २०२४ मध्ये त्याची कामगिरी कशी होते, हे पाहणे मनोरंजक असेल.

WhatsApp channel