Rohit Sharma : ऑस्ट्रेलिया दौऱ्याची तयारी सुरू, रोहित म्हणाला, 'या' ४ खेळाडूंची टीम इंडियाला गरज, वाचा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Rohit Sharma : ऑस्ट्रेलिया दौऱ्याची तयारी सुरू, रोहित म्हणाला, 'या' ४ खेळाडूंची टीम इंडियाला गरज, वाचा

Rohit Sharma : ऑस्ट्रेलिया दौऱ्याची तयारी सुरू, रोहित म्हणाला, 'या' ४ खेळाडूंची टीम इंडियाला गरज, वाचा

Published Oct 16, 2024 12:23 PM IST

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी एक मोठा खुलासा केला आहे. त्याने अशा चार खेळाडूंबद्दल सांगितले आहे ज्यांना त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर घेऊन जायचे आहे.

Rohit Sharma : ऑस्ट्रेलिया दौऱ्याची तयारी सुरू, रोहित म्हणाला, 'या' ४ खेळाडूंची टीम इंडियाला गरज, वाचा
Rohit Sharma : ऑस्ट्रेलिया दौऱ्याची तयारी सुरू, रोहित म्हणाला, 'या' ४ खेळाडूंची टीम इंडियाला गरज, वाचा (AP)

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना १६ ऑक्टोबरपासून बेंगळुरू येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया पूर्णपणे तयार आहे.

या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषद घेतली. यात त्याने अनेक मोठे खुलासे केले. याशिवाय त्याने आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाबतही माहिती दिली आहे. रोहित शर्माने त्या ४ युवा खेळाडूंबाबतही स्पष्ट संकेत दिले आहेत, ज्यांना तो ऑस्ट्रेलियाला घेऊन जाण्याचा विचार करत आहे.

न्यूझीलंड मालिकेतील ४ खेळाडू राखील

खरे तर जेव्हा न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. त्यावेळी टीम इंडियाच्या संघात ४ ट्रॅव्हल रिझर्व्हच्या नावांचाही समावेश करण्यात आला होता. हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. या चार ट्रॅव्हल रिझर्व्हमध्ये प्रसिद्ध कृष्णा, मयंक यादव, हर्षित राणा आणि नितीश कुमार रेड्डी यांच्या नावांचा समावेश आहे.

साधारणपणे, भारतीय संघ घरच्या मालिकेसाठी राखीव खेळाडूंची घोषणा करत नाही. अशा परिस्थितीत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने काही प्रमाणात परिस्थिती स्पष्ट केली आहे.

रोहित शर्मा काय म्हणाला?

रोहित शर्मा याने पत्रकार परिषदेत सांगितले की, प्रसिद्ध कृष्णा, मयंक यादव, हर्षित राणा आणि नितीश कुमार रेड्डी यांना संघात ठेवायचे आहे कारण आम्ही त्यांना ऑस्ट्रेलियाला घेऊन जाण्याचा विचार करत आहोत.

विशेषत: वेगवान गोलंदाजांसह त्यांना बेंच स्ट्रेंथ तयार करायची आहे. तो पुढे म्हणाला की त्यांच्याकडे फक्त ३ किंवा ४ नाही तर ८ किंवा ९ पर्याय आहेत.

फलंदाजीप्रमाणेच आम्हाला गोलंदाजीतही अधिक पर्याय हवे आहेत. या खेळाडूंना ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी तयार करायचे आहे, असे रोहित शर्माने आपल्या बोलण्यातून स्पष्ट केले. 

खरे तर ऑस्ट्रेलियात वेगवान गोलंदाजांची अधिक गरज भासेल. मयंक यादव देखील १५०+ KMPL च्या वेगाने गोलंदाजी करू शकतो. अशा स्थितीत ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कोणताही गोलंदाज जखमी झाल्यास हे खेळाडू त्याची जागा सहज घेऊ शकतील.

Whats_app_banner

संबंधित बातम्या