रोहित शर्मा आणि विराट कोहलीची क्रिकेट कारकीर्द शेवटच्या टप्प्यात आहे. खुद्द रोहित आणि विराटला यांनाही याची जाणीव झाली असेल. कारण बीसीसीआयने शुक्रवारी एक आढावा बैठक घेतली. यामध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या खेळाडूंच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला.
या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. जे खेळाडू प्रभावी कामगिरी करणार नाहीत, त्यांना संघातून काढण्यात कोणतीही दिरंगाई केली जाणार नाही, असेही बीसीसीआयच्या आढावा बैठकीत स्पष्ट करण्यात आले आहे.
आढावा बैठकीनंतर असाही अंदाज वर्तवला जात आहे की, विराट आणि रोहितने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी केली नाही तर त्यांनाही संघातून वगळले जाऊ शकते.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटप्रमाणेच देशांतर्गत क्रिकेटलाही महत्त्व द्यावे, असे आवाहन बीसीसीआयने खेळाडूंना केले आहे. त्यामुळे रोहित आणि विराट देशांतर्गत सामन्यांमध्ये खेळणार की नाही याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
गेल्या वर्षी दोन क्रिकेटपटूंसोबत कठोर पाऊले उचलण्यात आली होती. श्रेयस अय्यर आणि ईशान किशन यांनी देशांतर्गत क्रिकेटकडे दुर्लक्ष केले होते. तेव्हा या दोघांना बीसीसीआयने २०२४ च्या केंद्रीय कराराच्या यादीतून वगळले होते. आता प्रश्न असा आहे की बीसीसीआय विराट आणि रोहितच्या बाबतीत असे करू शकते का?
रोहित शर्मा आणि विराट कोहली जरी रणजी ट्रॉफी सामन्यात खेळले नसले तरी त्यांना श्रेयस अय्यर आणि इशान किशनसारखी वागणूक दिली जाणार नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विराटला खेळायचे असेल तर त्यांना पूर्वीप्रमाणेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जबरदस्त फलंदाजी करावी लागेल. त्यासाठी त्यांना पुन्हा बेसिकपासून सुरुवात करावी लागली तरी चालेल.
संबंधित बातम्या