विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी T20 विश्वचषक २०२४ चे विजेतेपद जिंकल्यानंतर T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. या दोन्ही दिग्गजांच्या अचानक निवृत्तीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसल. मात्र, दोन्ही खेळाडू कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट खेळत राहतील.
त्यामुळे आता चाहत्यांना प्रश्न पडला आहे, की विराट कोहली आणि रोहित शर्मा ही जोडी विश्वविजेती बनल्यानंतर मैदानात कधी परतणार?
टी-20 विश्वचषक २०२४ नंतर लगेचच, टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यावर ५ T20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. मालिका शनिवारपासून (६ जुलै) सुरू होणार आहे. रोहित आणि विराटने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाहेर पडले आहे. अशा परिस्थितीत दोन्ही खेळाडूंनी या मालिकेचा भाग नाहीत. झिम्बाब्वेविरुद्धच्या या मालिकेसाठी शुभमन गिलला भारतीय संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे.
यानंतर टीम इंडिया पांढऱ्या चेंडूच्या मालिकेसाठी श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात ३ एकदिवसीय सामन्यांची आणि टी-20 मालिका होणार आहे. या दौऱ्याची सुरुवात T20 मालिकेने होणार असून त्यातील पहिला सामना २७ जुलै रोजी होणार आहे. टी-20 मालिकेतील शेवटचा सामना ३० जुलै रोजी होणार आहे.
त्यानंतर भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे मालिका पुढील महिन्यात म्हणजेच २ ऑगस्टपासून सुरू होईल. या एकदिवसीय मालिकेद्वारे रोहित शर्मा आणि विराट कोहली मैदानात पुनरागमन करू शकतात. मात्र, रोहित आणि विराटच्या पुनरागमनाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आता रोहित शर्मा आणि विराट कोहली पुन्हा टीम इंडियाची जर्सी घालून मैदानात कधी उतरतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
रोहित शर्माने संपूर्ण विश्वचषकात चांगला फॉर्म दाखवला हे विशेष. तो या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. रोहितने ८ सामन्यांच्या ८ डावात ३६.७१ च्या सरासरीने आणि १५६.७१ च्या स्ट्राईक रेटने २५७ धावा केल्या. यात त्याने ३ अर्धशतके झळकावली. दुसरीकडे, विराट कोहली संपूर्ण स्पर्धेत फ्लॉप असल्याचे दिसून आले परंतु अंतिम सामन्यात त्याने ५९ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ७६ धावा केल्या.
संबंधित बातम्या