IND vs ENG ODI Rohit, Virat And Bumrah : भारतीय क्रिकेट संघ सध्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ साठी ऑस्ट्रेलियात आहे. यानंतर टीम इंडिया घरच्या भूमीवर इंग्लंडविरुद्ध पाच टी-२० सामन्यांची आणि तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे.
एकदिवसीय मालिकेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आले आहे, ज्यामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळणार नसल्याचे वृत्त आहे. रोहित-विराट व्यतिरिक्त वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह देखील वनडे मालिकेत सहभागी होणार नाही.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ पूर्वी इंग्लंडविरुद्धची मालिका ही भारतासाठी शेवटची एकदिवसीय मालिका असेल, ज्यामुळे खेळाडूंना एकदिवसीय स्वरूपाचा सराव करण्याची संधी मिळेल.
२२ जानेवारीपासून इंग्लंडविरुद्ध ही पांढऱ्या चेंडूची मालिका सुरू होणार असून, त्यामध्ये पहिली ५ टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.
त्यानंतर ६ फेब्रुवारीपासून एकदिवसीय मालिका सुरू होईल. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी-20 इंटरनॅशनलमधून निवृत्ती घेतली आहे, त्यामुळे दोघेही फक्त एकदिवसीय सामन्यांमध्येच खेळताना दिसतात, पण आता त्यावरही संकट आले आहे.
एका स्पोर्ट्स चॅनेलने दिलेल्या माहितीनुसार, रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह हे त्रिकूट वर्कलोड मॅनेजमेंटमुळे इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत सहभागी होणार नाही. तर बुमराह वर्कलोड मॅनेजमेंटमुळे टी-20 मालिकेतही संघाचा भाग असणार नाही. मात्र, रोहित, विराट आणि बुमराह यांच्याबाबत याचे अधिकृत अपडेट्स येणे बाकी आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी १९ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. दुसरीकडे, टीम इंडियाची इंग्लंडविरुद्धची वनडे मालिका १२ फेब्रुवारीला संपणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रीड मॉडेल अंतर्गत होणार आहे. पाकिस्तान या स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे, मात्र टीम इंडियाचे सर्व सामने दुबईत होणार आहेत. भारतीय संघ या स्पर्धेच्या बाद फेरीत पोहोचला तर उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीचे सामनेही दुबईतच होतील.
संबंधित बातम्या