T20 WC 2024 : वर्ल्डकप ट्रॉफी कशी उचलायची, कुलदीपने दिली रोहितला ट्रेनिंग, पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  T20 WC 2024 : वर्ल्डकप ट्रॉफी कशी उचलायची, कुलदीपने दिली रोहितला ट्रेनिंग, पाहा

T20 WC 2024 : वर्ल्डकप ट्रॉफी कशी उचलायची, कुलदीपने दिली रोहितला ट्रेनिंग, पाहा

Jun 30, 2024 04:28 PM IST

Team India Champion T20 WC 2024 : ट्रॉफी कशी उचलायची याची खास ट्रेनिंग कुलदीप यादवने रोहितला दिली होती. कुलदीपने त्याला लिओनेल मेस्सीची स्टाइल शिकवली.

वर्ल्डकप ट्रॉफी कशी उचलायची, कुलदीपने दिली रोहितला ट्रेनिंग, पाहा
वर्ल्डकप ट्रॉफी कशी उचलायची, कुलदीपने दिली रोहितला ट्रेनिंग, पाहा

Team India Champion T20 WC 2024 : टीम इंडियाने १० वर्षानंतर आयसीसी ट्रॉफी जिंकली. भारत चॅम्पियन बनल्यानंतर रोहित शर्मा खास पद्धतीने ट्रॉफी उचलण्यासाठी पोहोचला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे.

टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कप २०२४ च्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. या विजयासह त्याने दुसऱ्यांदा हे विजेतेपद पटकावले.

विशेष म्हणजे, ट्रॉफी कशी उचलायची याची खास ट्रेनिंग कुलदीप यादवने रोहितला दिली होती. कुलदीपने त्याला लिओनेल मेस्सीची स्टाइल शिकवली.

वास्तविक, X वर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये कुलदीप रोहितला ट्रॉफी कशी उचलायची हे शिकवताना दिसत आहे. कुलदीपने त्याला मेस्सीची स्टाइल शिकवली. रोहित जेव्हा ट्रॉफी उचलायला गेला तेव्हा तो मेस्सीप्रमाणे हळूहळू पुढे सरकत आला.

विराट कोहलीसह संपूर्ण संघाने त्याच्या स्टाईलचा आनंद लुटला. फायनलमध्ये टीम इंडियाच्या विजयानंतर खेळाडू खूप भावूक झाले होते. हार्दिक पांड्या ढसाढसा रडू लागला. पण ट्रॉफी उचलताना वातावरण एकदम हलके झाले होते.

टीम इंडियाने T20 वर्ल्ड कप २०२४ चा अंतिम सामना ७ धावांनी जिंकला. प्रथम फलंदाजी करताना भारताने १७६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ केवळ १६९ धावा करू शकला. यावेळी भारतीय संघाने या स्पर्धेत एकही सामना गमावला नाही. यावेळी दक्षिण आफ्रिकेने सर्व सामने जिंकले. मात्र अंतिम फेरीत त्यांचा पराभव झाला.

टीम इंडियाच्या विजयानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी T20 इंटरनॅशनलमधून निवृत्तीची घोषणा केली. रोहित आणि विराटची आतापर्यंतची कारकीर्द चांगली राहिली आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली होती. मात्र, येथे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

Whats_app_banner