मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  T20 WC 2024: टी-२० विश्वचषकात रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करेल, जय शाह यांची घोषणा

T20 WC 2024: टी-२० विश्वचषकात रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करेल, जय शाह यांची घोषणा

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 01, 2024 07:30 PM IST

Rohit Sharma T20 World Cup 2024 captain: अमेरिका-वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकात रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करेल, असे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी जाहीर केले.

Rohit Sharma
Rohit Sharma (PTI)

Rohit Sharma T20 World Cup 2024 Captain: अमेरिका-वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या आगामी टी-२० विश्वचषकात हार्दिक पांड्या (Hardik Pandya) नव्हे तर रोहित शर्मा (Rohit Sharma) भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे, अशी घोषणा बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) यांनी केली आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारतीय संघाने २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात अंतिम फेरी गाठली. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्ध विश्वचषकाच्या अंतिम लढाईत भारताला पराभव स्वीकारावा लागला. यावर जय शाह म्हणाले की,  रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने २०२३ च्या विश्वचषकात अंतिम फेरीत स्थान मिळवले. सलग १० सामने जिंकून आपण तिथे पोहोचलो. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारत २०२४ चा टी-२० विश्वचषक बार्बाडोसमध्ये जिंकेल, असा विश्वास जय शाह यांनी व्यक्त केला. भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि रोहित यांच्या उपस्थितीत जय शाहा यांनी हे वक्तव्य केले.

जानेवारी २०२३ मध्ये निवड समितीने हार्दिक पांड्याची कर्णधारपदी निवड केल्याने भारताच्या पांढऱ्या चेंडूच्या कर्णधारपदावर चर्चा सुरू झाली.  हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वात गुजरात टायटन्सने पदार्पणाच्या हंगामातच आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरले.

हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने आयपीएल २०२३ उपविजेतेपद जिंकले. दुसरीकडे रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली मुंबई इंडियन्सला गेल्या हंगामात काही खास कामगिरी करता आली नाही. त्यानंतर आगामी टी-२० विश्वचषकात हार्दिक पांड्या भारतीय संघाचे कर्णधारपद संभाळणार असल्याची घोषणा करण्यात आली. परंतु, एकदिवसीय विश्वचषकादरम्यान रोहितचा फॉर्म उंचावला आणि हार्दिकला स्पर्धेदरम्यान मोठी दुखापत झाली. ही एक विचित्र दुखापत होती. परंतु, तेव्हापासून हार्दिक पांड्या भारतीय संघापासून दूर आहे.

टी-२० विश्वचषकात हार्दिक पांड्या भारतीय संघाचा उपकर्णधार असणार आहे. वनडे विश्वचषकात हार्दिक दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवण्यात आले. रोहितने अफगाणिस्तानविरुद्ध टी-२० मालिकेत उत्कृष्ट फलंदाजी केली.  यामुळे मला वाटत नाही की, या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले पाहिजेत, असे जय शाह यांनी म्हटले आहे. 

विराटबाबत जय शाह काय म्हणाले?

कोहलीच्या वैयक्तिक विश्रांतीदरम्यान भारतीय बोर्ड त्याला पाठिंबा देत असल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे. जर एखाद्या खेळाडूने १५ वर्षांच्या कारकिर्दीत वैयक्तिक रजा मागितली तर ती समस्या नाही. विराट असा खेळाडू नाही जो विनाकारण रजा मागेल. आम्ही आमच्या खेळाडूला पाठिंबा द्यायला हवा. बीसीसीआय ही सर्वोच्च संस्था आहे. बीसीसीआय जे काही निर्णय घेईल ते फ्रँचायझींना मान्य करावे लागेल. खेळाडूंचा कामाचा ताण नेहमीच हाताळला जातो.

टी-२० विश्वचषक २०२४ मधील भारताचा संभाव्य संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, इशान किशन, विराट कोहली, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, अर्शदीप सिंह.

IPL_Entry_Point