मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  शेवटच्या सामन्यानंतर रोहितनं अनेक प्रश्नांची उत्तरं दिली, विराट आणि संजू सॅमसनबाबतही स्पष्टच बोलला! पाहा

शेवटच्या सामन्यानंतर रोहितनं अनेक प्रश्नांची उत्तरं दिली, विराट आणि संजू सॅमसनबाबतही स्पष्टच बोलला! पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 19, 2024 05:19 PM IST

Rohit Sharma on Virat Kohli And Sanju Samson : अफगाणिस्तानविरुद्धच्या शेवटच्या सामन्यानंतर रोहित शर्माने टी-20 विश्वचषकाच्या तयारीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. तसेच, त्याने संजू सॅमसन आणि विराट कोहलीबाबतही मोठे वक्तव्य केले आहे.

Rohit Sharma on Virat Kohli Sanju Samson
Rohit Sharma on Virat Kohli Sanju Samson

टीम इंडियाने अफगाणिस्तानविरुद्धची तीन टी-20 सामन्यांची मालिका जिंकली. मालिकेतील शेवटचा सामना (१७ जानेवारी) बंगळुरूच्या चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. हा सामना इतका रोमहर्षक झाला की या सामन्यात दोन सुपर ओव्हर खेळवाव्या लागल्या. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये भारताने बाजी मारली आणि मालिका ३-० ने जिंकली.

विशेष म्हणजे, टी-20 वर्ल्डकपआधी भारताची ही शेवटची मालिका होती. यानंतर भारत आता इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. त्यानंतर आयपीएल होईल. अफगाणिस्तान मालिका आणि आयपीएलमधील कामगिरीच्या आधारावर टी-20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची निवड होणार आहे.

रोहित शर्मा काय म्हणाला?

दरम्यान, अफगाणिस्तानविरुद्धच्या शेवटच्या सामन्यानंतर रोहित शर्माने टी-20 विश्वचषकाच्या तयारीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. तसेच, त्याने संजू सॅमसन आणि विराट कोहलीबाबतही मोठे वक्तव्य केले आहे.

अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनीही टी-20 फॉर्मेटमध्ये पुनरागमन केले. यासह हे दोघेही टी-20 वर्ल्डकप खेळण्यासाठी तयार असल्याचे दाखवून दिले आहे. रोहित मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात शुन्यावर बाद झाला पण त्याने शेवटच्या टी-20 मध्ये शतक झळकावून विरोधी संघांना धोक्याचा इशाराही दिला आहे.

कोहली आणि संजू सॅमसनचे इरादे स्पष्ट होते

बेंगळुरूमधील तिसर्‍या T20 नंतर ब्रॉडकास्टरशी बोलताना रोहितने कोहली आणि संजू सॅमसनचा इंटेट किती महत्त्वाचा होता यावर प्रकाश टाकला. विराट आणि संजू दोघेही त्या सामन्यात शुन्यावर बाद झाले होते.

सामन्यानंतर रोहित म्हणाला, की ‘आम्हाला फक्त खेळाडूंना त्यांची पोझिशन आणि क्रिकेटची स्टाइल स्पष्ट करायची आहे. जेव्हा ते मैदान येतात तेव्हा त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत हे त्यांना माहित आहे. कोहलीने येताच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, हे तुम्ही पाहिले. तो सहसा असे करत नाही, परंतु त्याने त्याचा हेतू दाखवून दिला. संजू सॅमसनसोबतही तेच घडले. तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला, पण त्याने आपला इरादा स्पष्ट केला होता’.

दरम्यान, विराटने तिसऱ्या टी-20 मध्ये बॅटने चमत्कार केला नाही, पण क्षेत्ररक्षणात उत्तम कामगिरी केली. विराटने सीमारेषेवर हवेत उडून षटकार वाचवला आणि त्यानंतर एक महत्त्वाचा झेलही घेतला. या गोष्टी सामन्यात निर्णायक ठरल्या. तर संजूनेही इब्राहिम झादरानला महत्वाची क्षणी यष्टीचीत केले तर करीम जनतला धावबाद केले.

WhatsApp channel