रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून २०२४ चा टी-20 विश्वचषक जिंकला. आता या चॅम्पियन संघातील काही खेळाडू लवकरच एका टीव्ही शोमध्ये दिसणार आहेत. या शोमध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा हादेखील दिसणार आहे.
वास्तविक, 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो'चा दुसरा सीझन सुरू होणार आहे. दुसरा सीझन २१ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. यासाठी एक प्रोमो व्हिडिओ लाँच करण्यात आला आहे. या प्रोमो व्हिडिओमध्ये बॉलिवूडचे मोठे स्टार्स आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील ज्युनियर कलाकारही दिसत आहेत. यानंतर या प्रोमोमध्ये भारतीय क्रिकेट संघाचे टीमचे स्टार्सही दिसले.
व्हिडिओमध्ये रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, अक्षर पटेल आणि वेगवान गोलंदाज अक्षर पटेल दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये कपिल रोहितला प्रश्न विचारताना दिसत आहे. कपिलने विचारले की, मागच्या वेळी तू इथे आला होतास तेव्हा भारतीय संघ उपविजेता होता. यावेळी तुम्ही चॅम्पियन म्हणून आला आहात. कपिल शर्मा शो तुमच्यासाठी लकी आहे का? या प्रश्नावर सगळेच हसताना दिसले.
भारताने १७ वर्षांनंतर दुसऱ्यांदा T20 विश्वचषक जिंकला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. सूर्यकुमार यादवने डेव्हिड मिलरचा ऐतिहासिक झेल घेतला आणि भारताचा विजय निश्चित झाला. यापूर्वी २००७ मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारत चॅम्पियन झाला होता.
भारत आणि बांगलादेश यांच्यात १९ सप्टेंबरपासून कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणाही करण्यात आली. पहिला सामना १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
तर मालिकेतील दुसरी कसोटी २७ सप्टेंबरपासून कानपूरमध्ये होणार आहे. मात्र, दुसऱ्या कसोटीसाठी संघाची निवड अद्याप झालेली नाही. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेशिवाय भारत आणि बांगलादेश यांच्यात ३ टी-20 सामन्यांची मालिकाही खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी अद्याप संघाची निवड झालेली नाही.
संबंधित बातम्या