Rohit Sharma : सिक्सर किंग रोहित शर्मा… वनडेत ख्रिस गेलला मागे टाकले, तर टॉपवर अजूनही हा पाकिस्तानी फलंदाज
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Rohit Sharma : सिक्सर किंग रोहित शर्मा… वनडेत ख्रिस गेलला मागे टाकले, तर टॉपवर अजूनही हा पाकिस्तानी फलंदाज

Rohit Sharma : सिक्सर किंग रोहित शर्मा… वनडेत ख्रिस गेलला मागे टाकले, तर टॉपवर अजूनही हा पाकिस्तानी फलंदाज

Published Feb 09, 2025 07:35 PM IST

Rohit Sharma, IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात कटकच्या बाराबती स्टेडियमवर वनडे सामना खेळला जात आहे. या सामन्यातून रोहित शर्मा फॉर्ममध्ये परतला असून त्याने एक मोठा विक्रम केला आहे. रोहितने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेल याला मागे टाकले आहे.

Rohit Sharma : सिक्सर किंग रोहित शर्मा… ख्रिस गेलला मागे टाकले, तर टॉवर अजूनही हा पाकिस्तानी फलंदाज
Rohit Sharma : सिक्सर किंग रोहित शर्मा… ख्रिस गेलला मागे टाकले, तर टॉवर अजूनही हा पाकिस्तानी फलंदाज (PTI)

Rohit Sharma Most Sixes In Odi Cricket : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा वनडे सामना आज (९ फेब्रुवारी) कटक येथील बाराबती स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड संघाने फलकावर ३०४ धावा लावल्या. 

या डोंगरासारख्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी टीम इंडियाला सलामीवीरांकडून चांगली सुरुवात करण्याची गरज होती. यानंतर घडलेही तसेच, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने येताच इंग्लंडच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला.

रोहित शर्माची स्पोटक फलंदाजी

रोहित शर्मा मैदानात उतरताच त्याने इंग्लंडच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. रोहितने अवघ्या ३० चेंडूत अर्धशतक झळकावले. हे वृत्त लिहिपर्यंत रोहित शर्मा ४९ चेंडूत ७९ धावांवर खेळत होता. त्याने आतापर्यंत ५ चौकार आणि ६ षटकार मारले आहेत.

यासह रोहितने एका मोठ्या विक्रमामध्ये ख्रिस गेलला मागे टाकले आहे. हा विक्रम एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आहे. हे वृत्त लिहिपर्यंत रोहितने एकूण ३३५ षटकार ठोकले आहेत. तर ख्रिस गेलच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३३१ षटकार होते.

शाहिद आफ्रिदी वर आहे

वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर आहे. या यादीत पाकिस्तानचा महान फलंदाज शाहिद आफ्रिदीचे नाव आहे. आफ्रिदीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकूण ३५१ षटकार मारले होते.

या यादीत चौथ्या क्रमांकावर श्रीलंकेचा सनथ जयसूर्या आहे. जयसूर्याने २७० षटकार मारले होते. याशिवाय या यादीत पुढचा क्रमांक एमएस धोनीचा आहे. धोनीने आपल्या बॅटने २२९ षटकार मारले आहेत.

रोहितच्या नावावर अनेक विक्रम

रोहित शर्माच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये इतरही अनेक विक्रम आहेत. रोहितने सर्वाधिक षटकार मारण्याबरोबरच वनडेमध्ये तीन वेळा द्विशतकही ठोकले आहे. याशिवाय रोहित वनडेत ११ हजार धावा पूर्ण करण्याच्या जवळ आहे.

Rohit Bibhishan Jetnavare

eMail

Whats_app_banner

संबंधित बातम्या