भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना धरमशालाच्या मैदानावर खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या २ दिवसांच्या खेळात टीम इंडियाने शानदार खेळ केला आणि कसोटीवर आपली पकड मजबूत केली. आज (९ मार्च) तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारतीय संघाचा पहिला डाव ४७७ धावांवर संपला आणि २५९ धावांची आघाडीही मिळवण्यात यश आले.
यानंतर टीम इंडिया क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरली तेव्हा कर्णधार रोहित शर्मा मैदानावर आला नाही, त्यानंतर बीसीसीआयकडून याबाबत अपडेट देण्यात आले आहे.
वास्तविक, धरमशाला कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी रोहित शर्मा क्षेत्ररक्षणासाठी मैदानात आला नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने याबाबतची संपूर्ण माहिती सोशल मीडियावर दिली आहे. रोहित शर्माला पाठदुखीचा त्रास होत असल्याने तो फिल्डिंगला आला नाही, असे बीसीसीआयने सांगितले आहे.
दरम्यान, या मालिकेत कर्णधार रोहित शर्माच्या दोन शानदार शतकी खेळी पाहायला मिळाल्या. त्याने या सामन्याच्या पहिल्या डावात १०३ धावा केल्या. त्याने १६२ चेंडूंचा सामना करताना १३ चौकार आणि ३ षटकार मारले. रोहित आणि शुभमन गिल यांच्यात चांगली भागीदारी झाली. शुभमननेही शतक झळकावले.
यानंतर आता रोहितच्या अनुपस्थितीत, कर्णधारपदाची जबाबदारी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सांभाळत आहे.
धर्मशाला कसोटी सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा पहिला डाव खेळण्याच्या पहिल्या दिवशी २१८ धावांवर आटोपला. यानंतर रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल या सलामीच्या जोडीने शानदार शतकी भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. यानंतर रोहितने १०३ धावांची खेळी केली, तर शुभमन गिलने ११० धावांची खेळी खेळली.
मधल्या फळीत देवदत्त पडिकलने ६५ धावा केल्या तर सर्फराज खान ५६ धावा करण्यात यशस्वी ठरला. इंग्लंडकडून शोएब बशीरने या डावात ५ तर जेम्स अँडरसन आणि टॉम हार्टलीने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
संबंधित बातम्या