मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Rohit Sharma Video : लाखोंच्या गर्दीत रोहित शर्मा अचानक बसमधून उतरला, नंतर स्टेडियमकडे धावला, नेमकं काय घडलं? पाहा

Rohit Sharma Video : लाखोंच्या गर्दीत रोहित शर्मा अचानक बसमधून उतरला, नंतर स्टेडियमकडे धावला, नेमकं काय घडलं? पाहा

Jul 05, 2024 09:41 AM IST

टी-20 वर्ल्डकप विजयानंतर टीम इंडियाचा रोड शो मुंबईत झाला. जिथे टीम इंडिया ओपन बसवर स्वार होऊन मरीन ड्राइव्ह मार्गे वानखेडे स्टेडियमवर पोहोचली.

Rohit Sharma Video : लाखोंच्या गर्दीत रोहित शर्मा अचानक बसमधून उतरला, नंतर स्टेडियमकडे धावला, नेमकं काय घडलं? पाहा
Rohit Sharma Video : लाखोंच्या गर्दीत रोहित शर्मा अचानक बसमधून उतरला, नंतर स्टेडियमकडे धावला, नेमकं काय घडलं? पाहा

टी-20 विश्वचषक २०२४ ची ट्रॉफी जिंकून भारतीय क्रिकेट संघ अखेर (४ जुलै) मायदेशी परतला. बार्बाडोसच्या मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. या सामन्यानंतर तेथे आलेल्या चक्रीवादळामुळे टीम इंडिया लगेच मायेदशी परतू शकली नाही.

५ दिवसानंतर टीम भारतात परतली. यानंतर टीम इंडियाच्या चाहत्यांनी अगदी जल्लोषात आणि लाखोंच्या गर्दीने जमा होत स्वागत केले. आधी दिल्ली आणि नंतर मुंबई या दोन्ही मोठ्या शहरांमध्ये चाहत्यांची मोठी गर्दी होती. चाहत्यांनी कॅप्टन रोहित शर्मा, मुंबईचा राजा रोहित शर्मा अशा घोषणा दिल्या. या सगळ्यामध्ये रोहित शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

खरंतर टीम इंडियाचा रोड शो मुंबईत झाला. जिथे टीम इंडिया ओपन बसवर स्वार होऊन मरीन ड्राइव्ह मार्गे वानखेडे स्टेडियमवर पोहोचली.

ट्रेंडिंग न्यूज

या दरम्यान, लाखोंच्या गर्दीत कर्णधार रोहित शर्मा वानखेडे स्टेडियमच्या काही अंतर आधी बसमधून खाली उतरला आणि धावत-पळत नाचत स्टेडियममध्ये पोहोचला. बाकीची टीम बसमध्येच राहिली. त्याचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या वानखेडे स्टेडियममधील रोहित शर्माचे भाषण ऐकून रडला. भारताच्या T20 विश्वचषक २०२४ च्या विजयाच्या उत्सवादरम्यान बोलताना शर्मा याने विजेतेपदाचे श्रेय हार्दिक पांड्याला दिले. रोहित म्हणाला की, पंड्याच्या शांत आणि संयमी राहण्याच्या स्वभावामुळे डेव्हिड मिलरला बाद करण्यात मदत झाली. हे ऐकून हार्दिक पांड्याच्या डोळ्यात अश्रू आले.

रोहित आणि विराटने स्टेडियममध्ये डान्स केला

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चक दे ​​इंडियाच्या तालावर नाचून आनंद साजरा केला. मरीन ड्राइव्ह येथे ओपन-टॉप बसमध्ये विजय परेडनंतर भारतीय संघ रात्री ९ वाजता वानखेडे स्टेडियमवर पोहोचला. वानखेडे स्टेडियममध्ये पोहोचल्यानंतर रोहितने विराट कोहलीला आपल्यासोबत प्रेक्षक स्टँडकडे खेचले आणि दोघांनीही भांगडा केला.

WhatsApp channel