Rohit Sharma Captaincy Record : टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली टी-20 विश्वचषक २०२४ जिंकला होता. त्याचबरोबर आता भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. भारतीय संघ उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला भिडणार आहे.
मात्र, आता कर्णधार म्हणून टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर रोहित शर्मा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी होईल का? कर्णधार म्हणून रोहित शर्माचे रेकॉर्ड काय सांगतात? रोहित शर्माने आतापर्यंत १४० सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. ज्यामध्ये भारताने १०१ सामने जिंकले आहेत. तर ३३ सामन्यांत भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. याशिवाय ३ सामने अनिर्णित राहिले आहेत.
रोहित शर्माने ५४ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. ज्यामध्ये भारताने ४० एकदिवसीय सामने जिंकले आहेत. तर १२ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. या फॉरमॅटमध्ये भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली ७४.०७ टक्के सामने जिंकले आहेत.
रोहित शर्माने २२ कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. ज्यामध्ये टीम इंडियाने १२ टेस्ट जिंकल्या आहेत. तसेच ९ कसोटी सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. याशिवाय ३ कसोटी ड्रॉ झाल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ५० टक्के सामने जिंकले.
एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांव्यतिरिक्त, रोहित शर्माने ६२ टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. या फॉरमॅटमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने ४९ विजय मिळवले आहेत. तर टीम इंडियाला १२ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला. याशिवाय एक सामना बरोबरीत सुटला.
या फॉरमॅटमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ७४.४१ टक्के सामने जिंकले. मात्र, कर्णधार म्हणून रोहित शर्मा चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरतो का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. याआधी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने T20 विश्वचषक जिंकून इतिहास रचला होता. टी-20 विश्वचषक जिंकणारा रोहित शर्मा हा महेंद्रसिंह धोनी याच्यानंतरचा दुसरा भारतीय कर्णधार ठरला.
संबंधित बातम्या